सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी चौकशी समितीच्या अहवालाला आणि तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या केलेल्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने ३० जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता, जो अखेर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात देण्यात आला.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. खंडपीठाने म्हटले की, "जर तुम्हाला वाटत असेल की ही प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, तर तुम्ही चौकशीत का भाग घेतला? तुम्ही त्याला ताबडतोब आव्हान देऊ शकला नसता का? तुमच्या कृतीवरून असे दिसते की तुम्ही वाट पाहिली." न्यायालयाने असेही म्हटले की, मुख्य न्यायाधीशांचे कार्यालय हे केवळ पोस्ट ऑफिस नाही. असे आरोप झाल्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना माहिती देणे ही मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी आहे.

मार्च २०२५ मध्ये, न्यायाधीश यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात असताना, त्यांच्या सरकारी निवासस्थानाला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात अर्धवट जळालेले पैसे सापडले होते. तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तीन न्यायाधीशांची एक अंतर्गत समिती स्थापन केली होती. यात न्यायाधीश शील नागू, न्यायमूर्ती जीएस संधावाल्या आणि न्यायमूर्ती अनु शिवरामन होते. समितीने ५५ साक्षीदारांचे जबाब आणि व्हिडिओ-फोटो पुराव्यांच्या आधारे असा निष्कर्ष काढला की न्यायमूर्ती वर्मा आणि त्यांच्या कुटुंबाला या रोख रकमेची माहिती होती. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, जो त्यांनी नाकारला. यानंतर, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना शिफारस पाठवण्यात आली, त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनीही महाभियोगाच्या सूचना पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या केलेल्या शिफारशीला आव्हान देण्यासाठी न्यायमूर्ती यशवंत वर्मा सर्वोच्च न्यायालयात गेले. वर्मा यांनी अंतर्गत प्रक्रियेच्या घटनात्मक वैधतेवरही प्रश्न उपस्थित केले. पण सर्वोच्च न्यायालयाने वर्मांबाबत तत्कालीन मुख्य न्यायाधीशांचा निर्णय वैध ठरवला.
Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे