मुंबई: स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील येसूबाई म्हणजेच खऱ्या आयुष्यातील प्राजक्ताचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला आहे. तिच्या खऱ्या आयुष्यातील शंभूराजे तिच्या जीवनात आले आहेत. प्राजक्ताने तिच्या जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची कणखर भूमिका साकारल्याने प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. तिने मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने आपला साखरपुडा होत असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. तिचे लवकरच लग्न होणार असल्याचे तिने फोटोतून दाखवले होते. मात्र तिचा होणारा जोडीदार कोण असेल याची माहिती तिने गुलदस्त्यात ठेवली होते. अखेर तिच्या जोडीदाराचे फोटो समोर आले आहेत.
प्राजक्ता आणि तिच्या खऱ्या आयुष्यातील शंभूराज यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेक कलाकारांनी तिला तिच्या नव्या इनिंग्जसबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.