ट्रम्प यांची 'बोलती बंद' करणारी धक्कादायक आकडेवारी समोर!

भारतावर आरोप करणारे ट्रम्प स्वतः रशियाशी किती व्यापार करतात?


डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका; स्वतः रशियाकडून करतात अब्जावधींची आयात


नवी दिल्ली : भारताने रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्क्यांनी टॅरिफ वाढवले आहेत. मात्र, भारताने जेव्हा अमेरिकेचाच रशियासोबतचा अब्जावधींचा व्यापार त्यांच्या निदर्शनास आणून दिला, तेव्हा ट्रम्प यांची बोलतीच बंद झाली. "मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही. मला माहिती घ्यावी लागेल," अशा बचावात्मक भूमिकेत ट्रम्प यांनी दिलेली ही प्रतिक्रिया, आता जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. भारताच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे ट्रम्प स्वतःच्याच देशाच्या व्यापाराबद्दल अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे.



ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ ५० टक्क्यांनी वाढवले आहे. भारत आणि रशिया यांच्यात होणाऱ्या व्यापारावर ते नाखूष असल्याचे म्हणाले. पण अमेरिका आणि रशिया यांच्यातही व्यापार केला जातो, हे भारताने निदर्शनास आणून दिल्यानंतर मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची उत्तरे देताना भंबेरी उडाली. ट्रम्प यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता डोनाल्ड ट्रम्प यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. “मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही. मला याबद्दल माहिती घ्यावी लागेल”, असे ट्रम्प म्हणाले.



अमेरिका-रशियाचा अब्जावधींचा व्यापार


युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या आकडेवारीनुसार, अमेरिका आणि रशिया यांच्यात २०२४ या वर्षात एकूण ५.२ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. यामध्ये ३.५ अब्ज डॉलर्स किमतीचा विविध वस्तूंचा व्यापार आहे. तर अमेरिकेने रशियाला ५२८.३ दशलक्ष डॉलर्सची निर्यात केली आहे. याशिवाय रशियातून ३ अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली.


तसेच यूएस सेन्सस ब्युरो आणि ब्युरो ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिसच्या ताज्या आकडेवारीनुसार रशियाकडून केल्या जाणाऱ्या आयातीमध्ये घट झाली आहे. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यात २.५ अब्ज डॉलर्सची घट झाल्याचे समोर आले आहे. तर जानेवारी २०२२ पासून ते आतापर्यंत अमेरिकेने रशियाकडून विविध वस्तूंची २४.५१ डॉलर्स किमतीची आयात केली आहे.



प्रमुख आयात केलेल्या वस्तू


खते – अमेरिकेने २०२४ मध्ये रशियातून १.२७ अब्ज डॉलर्स किमतीची खते आयात केली.


युरेनियम आणि प्लुटोनियम – ६२४ दशलक्ष डॉलर्स किमतीचे युरेनियम आणि प्लुटोनियम आयात करण्यात आले.


पॅलेडियम – २०२४ साली ८७८ दशलक्ष डॉलर्सचे पॅलेडियम आयात करण्यात आले.


अमेरिकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात होत असताना भारत आणि रशियाच्या व्यापारावर लक्ष वळविले जात आहे. असे असले तरी ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिटिव्ह (GTRI) ने देखिल ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जीटीआरआयने ट्रम्प यांच्या भूमिकेवर टीका केली. रशियातून मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारा चीन आहे, तरीही ट्रम्प भारतालाच लक्ष्य करत असल्याची टीका त्यांनी केली.


२०२४ साली चीनने रशियाकडून ६२.६ अब्ज डॉलर्सचे तेल आयात केले होते. तर भारताने ५२.७ अब्ज डॉलर्सची आयात केली होती. पण ट्रम्प यांनी अद्याप चीनच्या खरेदीवर प्रश्न उपस्थित केलेले नाही, असा मुद्दा जीटीआरआयने उपस्थित केला आहे. भारतावर ५० टक्के आणि चीनवर केवळ ३० टक्के टॅरिफ आकारल्याने ट्रम्प यांच्या नीतीवर जगभरातून टीका करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

रशियातील महत्त्वाच्या दोन तेल कंपन्यांवर ट्रम्पचे निर्बंध, रशियावर येणार आर्थिक दबाव! भारतालाही बसणार का फटका?

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबियामध्ये मोठा निर्णय; ‘कफला’ पद्धतीचा शेवट, भारतीय कामगारांना मोठा दिलासा

सौदी अरेबिया : सौदी अरेबियामध्ये गेल्या ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेली कफला पद्धत अखेर रद्द करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये अचूक फेकला 'टोमॅटो बॉम्ब'

पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये! कराची : भारतात झालेल्या

ट्रम्प यांचा ८८ लाख रुपयांचा एच-१बी 'व्हिसा बॉम्ब' आजपासून लागू, जाणून घ्या कोणाला सूट मिळणार

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, H-1B

पाकिस्तानमध्ये ४.७ तीव्रतेचा भूकंप; अनेक घरांचे नुकसान

इस्लामाबाद: सोमवारी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार,

फिलीपिन्समध्ये फेंगशेन वादळ, १४,००० लोक बेघर; ७ जणांचा मृत्यू

मनिला : उत्तर आणि मध्य फिलिपिन्समध्ये आलेल्या उष्णकटिबंधीय वादळ ‘फेंगशेन’मुळे किमान ७ लोकांचा मृत्यू झाला आहे.