गोवा : गोव्यात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. या वेळी बोलताना त्यांनी ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी आपल्या सरकारच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. फडणवीस म्हणाले, “ओबीसी महासंघाची सुरुवात २००५ मध्ये एका छोट्याशा खोलीतून झाली होती, पण आज तो एक प्रभावशाली मंच बनला आहे. माझा सातत्याने या संघटनेशी संपर्क राहिला असून, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
परदेशी शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना संधी
तसेच, त्यांनी पुढे नमूद केलं की, “आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाच्या संधी खुल्या केल्या असून, अनेक विद्यार्थी याचा लाभ घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकत आहेत. येत्या काळात या समाजासाठी आणखी चांगले निर्णय घेतले जातील.” फडणवीसांच्या या विधानांमुळे अधिवेशनात नवचैतन्य निर्माण झालं असून, ओबीसी समाजातील अनेकांनी याचे स्वागत केले आहे.
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय ६३) यांचा त्यांच्याच राहत्या घरी खून ...
मला टार्गेट करण्यात आलं : मुख्यमंत्री फडणवीस
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. आपल्या राष्ट्रीयस्तरावर ओबीसींचा बोलबाला झाल्याचे आपल्याला बघायला मिळाले. हेच नाही तर स्वातंत्र्य काळानंतर सर्वात जास्त ओबीसींना मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थान दिले. माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोलल्याबद्दल माझ्यावर टीका झाली. मला टार्गेट करण्यात आलं. मला कितीही टार्गेट केलं तरीही मी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणार आहे आणि माझी लढाई चालूच राहणार आहे.
'ओबीसी समाजासाठी माझी लढाई थांबणार नाही'
“माझ्यावर कितीही टीका झाली, तरीही मी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढत राहणार आहे.” फडणवीस म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः ओबीसी समाजातून येतात. स्वातंत्र्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी नेत्यांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे, आणि याचं श्रेय पंतप्रधान मोदींनाच जातं.” तसेच त्यांनी आपल्यावर झालेल्या टीकेचाही उल्लेख केला. “ओबीसी समाजासाठी बोलल्यामुळे माझ्यावर टीका झाली, मला टार्गेट करण्यात आलं. पण मी न घाबरता लढत राहणार आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही,” असं ठाम मत मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडलं. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे अधिवेशनात उपस्थित ओबीसी प्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
"ओबीसी समाजासाठी लढतोय म्हणजे इतरांचा विरोध करतोय, हे चुकीचं चित्र!"
“मी आज मुख्यमंत्री आहे, हे ओबीसी समाजासह सर्व समाजाच्या आशीर्वादामुळेच शक्य झालं आहे. एखाद्या समाजासाठी लढतो म्हणजे इतर समाजाच्या विरोधात आहोत, असं दाखवणं पूर्णपणे चुकीचं आहे.” फडणवीस यांनी सरकारने ओबीसी समाजासाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची यावेळी आठवण करून दिली. “आम्ही ओबीसींसाठी ५० महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांना त्यांचं आरक्षण पुन्हा मिळवून दिलं. काही लोकांनी याविरोधात कोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टानेदेखील निर्णय ओबीसी समाजाच्या बाजूने दिला आणि त्यांना पुन्हा २७ टक्के हक्काचं आरक्षण मिळालं,” असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.
"ओबीसी समाजासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही"
“समाजाचं कार्य आणि सहभाग महत्त्वाचा आहे, कारण त्यातूनच समाजाचं खऱ्या अर्थाने कल्याण होतं. आम्ही ओबीसी समाजासाठी कुठेही निधीची कमतरता जाणवू देणार नाही.” फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं की, “जर गरज भासली, तर अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल.” यासोबतच त्यांनी महाराष्ट्रासह गोव्यातही ओबीसी समाजाच्या हितासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास व्यक्त केला. अधिवेशनात विविध विषयांवर फडणवीसांनी आपली मते मांडली असून, त्यांच्या भाषणातून सरकारचा ओबीसी समाजाविषयी असलेला सकारात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून आला.