मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली.



या बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, राज्यकर, वस्तू व सेवा कर आयुक्त आशिष शर्मा, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन, ‘मित्रा’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल तसेच, ‘मित्रा’चे अर्थ तज्ज्ञ संजीव सक्सेना, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक सत्यनारायण कोठे आणि अर्थतज्ञ ऋषी शाह यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.


या बैठकीत जीडीपी, रोजगार, वाणिज्य आदी महत्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर संभाव्य परिणाम, तसेच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.


राज्यातील उद्योगांचे हित आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीने समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आखण्यातयेतील. या अनुषंगाने केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


राज्यातील उद्योगांचे हित जोपासण्यासाठी आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर

मुंबईतले रस्ते धुळमुक्त करण्यासाठी 'ही' योजना राबवणार

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत

धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल ‘जनरल मेडिसिन’ कडे

मुंबई (प्रतिनिधी): देशातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी २०२५) यंदा विद्यार्थ्यांचा कल एमडी

मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने

केंद्र उभारणीच्या कामाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत एकूण ७ ठिकाणी मलजल

बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करणार

मुंबई : राज्यात बेकायदेशीर पद्धतीने तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट