मुंबई : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन काशिनाथ पाटील यांची राज्य कर विभागाचे विशेष आयुक्तपदी, अभय महाजन यांची राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, ओंकार पवार यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती आशा अफजल खान पठाण यांच्याकडे नागपूरच्या वनमती महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.