Kelley Mack : 'द वॉकिंग डेड' फेम अभिनेत्री केली मॅकचे निधन; वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॉलिवूड आणि टीव्ही सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री केली मॅक (Kelley Mack) हिचं वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी निधन झालं आहे. ‘The Walking Dead’, ‘Chicago Med’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून ओळख मिळवलेली केलीने ३ ऑगस्ट रोजी तिच्या मूळगावी सिनसिनाटी (Cincinnati, Ohio) येथे अखेरचा श्वास घेतला.



गंभीर आजाराशी लढा


मिळालेल्या माहितीनुसार, केली गेल्या काही काळापासून सेंट्रल नर्व्हस सिस्टिममधील ग्लायोमा (glioma of the central nervous system) या दुर्धर आजाराशी झुंज देत होती. या आजाराविरुद्ध लढा देत असतानाच ती जगाचा निरोप घेऊन गेली. केलीच्या निधनाची बातमी तिच्या बहिणीने सोशल मीडियावर शेअर करत दु:ख व्यक्त केलं. तिने लिहिलं, “अत्यंत दुःखद अंतःकरणाने आम्ही आमच्या प्रीय केलीच्या निधनाची बातमी देत आहोत. तिचा तेजस्वी आणि प्रभावशाली प्रकाश आता पलीकडे विलीन झाला आहे. तिचा शेवटचा क्षण तिच्या आई क्रिस्टन आणि मावशी करेन यांच्या उपस्थितीत शांततेत गेला.”



तिने पुढे लिहिलं, "केली आता तिच्या जवळच्या व्यक्तींना विविध फुलपाखरांच्या रूपात भेट देत आहे. तिची अनुपस्थिती शब्दांत मांडता येणार नाही इतकी ती जाणवेल.” बहिणीने भावनिक शब्दात पुढे लिहिलं, "ती सर्वांना सांगू इच्छित होती की तिला सगळ्यांवर खूप प्रेम होतं. आणि एक बहीण म्हणून मी सांगू इच्छिते की ती किती धैर्यवान होती. देवाकडे परत जाण्याचा निर्णय तिने खंबीरपणे घेतला. मला तिचा खूप अभिमान आहे.”





जन्मतःच Kelley Lynne Klebenow या नावाने ओळखली जाणारी केली मॅकचा जन्म १० जुलै १९९२ रोजी सिनसिनाटीत झाला. लहान वयातच तिने कमर्शियल अ‍ॅड्समधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.२००८ मध्ये ‘The Elephant Garden’ या लघुपटातून अभिनयाची सुरुवात केली आणि या भूमिकेसाठी न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीच्या टिश स्कूल ऑफ आर्ट्सकडून तिला सन्मान मिळाला. हा लघुपट Tribeca Film Festival मध्ये Student Visionary Award विजेता ठरला होता.



‘The Walking Dead’ मध्ये मिळाली खरी ओळख


२०१८-१९ मध्ये प्रसिद्ध झोम्बी मालिका 'द वॉकिंग डेड'च्या नवव्या सिझनमध्ये केलीने "ॲडी" ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने ‘९-१-१’, ‘Chicago Med’, ‘Modern Family’ स्पिनऑफ यांसारख्या मालिकांमध्ये अतिथी अभिनेत्री म्हणून चमकदार कामगिरी केली.



सिनेमा आणि निर्मितीतही केलीचा ठसा


तिने ११ वर्षे लॉस एंजेलिसमध्ये राहून फिल्म, टीव्ही, कमर्शियल्स, आणि व्हॉइस-ओव्हर क्षेत्रात सक्रिय काम केलं. Spider-Man: Into the Spider-Verse या ऑस्कर विजेत्या अ‍ॅनिमेशन चित्रपटात ती Hailee Steinfeld च्या Gwen Stacy चा आवाज होती.


Broadcast Signal Intrusion या चित्रपटात तिने हॅरी शम जूनियर सोबत काम केलं.



केलीची निर्मितीमधील महत्वाची कामगिरी



  • A Knock at the Door (२०१६) – अटलांटा हॉरर फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार विजेती

  • Positive (२०१५) – लेखन, दिग्दर्शन, संकलन

  • The Kingdom (२०१४) – छायाचित्रण

  • Universal – Stephen Portland यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका आणि कार्यकारी निर्मात्याची भूमिका

Comments
Add Comment

पाकिस्तानात 'Gen Z'चा भडका! युवा पिढी रस्त्यावर उतरल्याने शाहबाज शरीफ आणि मुनीर यांची धाकधूक वाढली

नेपाळ, मादागास्करनंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये युवा पिढीचा रोष इस्लामाबाद : नेपाळ आणि मादागास्करसारख्या

बांगलादेशमध्ये पुन्हा अस्थिरतेचे वारे ? जमात -ए- इस्लामीचा युनूस सरकारला निर्वाणीचा इशारा

ढाका : आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर देशात मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जमात -ए- इस्लामी या इस्लामिक

चीनचे अंतराळवीर अवकाश स्थानकात अडकले

बीजिंग : चीनच्या मानवी अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. चीनच्या अंतराळ स्थानकाला सूक्ष्म अंतराळ कचऱ्याची

पिगी बँकमध्ये साठवली ५७ हजारांची चिल्लर...

वॉशिंग्टन  : आधुनिक मुलं डुकराच्या आकाराच्या भिशीत म्हणजेच ‘पिगी बँक’मध्ये नाणी साठवून बचत करण्याची सवय लावून

चीनचे अंतराळवीर अवकाश स्थानकात अडकले; स्पेस एजन्सीने दिली मोठी माहिती

बीजिंग : चीनच्या मानवी अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. चीनच्या अंतराळ स्थानकाला सूक्ष्म अंतराळ कचऱ्याची

पुढील पर्याय फक्त युद्ध असेल, अफगाणिस्तान पाकिस्तान वादावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे निर्वाणीचे वक्तव्य

पाकिस्तान: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धस्थितीवर आज तुर्कीमध्ये उच्चस्तरीय चर्चा पुन्हा सुरू