पिगी बँकमध्ये साठवली ५७ हजारांची चिल्लर...

वॉशिंग्टन  : आधुनिक मुलं डुकराच्या आकाराच्या भिशीत म्हणजेच ‘पिगी बँक’मध्ये नाणी साठवून बचत करण्याची सवय लावून घेत असतात. अमेरिकेतील ओरेगन राज्यातील पोर्टलँड शहरात राहणारे एली पियाट यांनाही लहानपणापासूनच नाणी साठवण्याची सवय होती. गेल्या १० वर्षांपासून ते त्यांच्या ‘स्टार वॉर्स’ थीमच्या पिगी बँकमध्ये सुट्टे पैसे टाकत होते. अलीकडेच जेव्हा त्यांनी ही भिशी उघडली आणि त्यातील सर्व नाणी मोजली, तेव्हा त्यांना ही लहानपणीची ‘बचत’ पाहून धक्काच बसला. ही रक्कम एकूण ५७ हजार रुपयांची होती!


एली यांनी आपली सर्व नाणी एका कॉईनस्टार मशिनमध्ये टाकली. हे एक असे मशिन आहे, जे नाण्यांना नोटा किंवा गिफ्ट कार्डमध्ये रूपांतरित करते. मशिनने मोजणीनंतर सांगितले की, त्यात ८०१ पेनी, ९२८ निकेल, १२०२ डाइम, २००२ क्वार्टर, १ हाफ-डॉलर कॉइन आणि ११ डॉलरच्या नोटा होत्या. एकूण रक्कम ६८६.६१ डॉलर्स (सुमारे ५७,००० रुपये) इतकी झाली. कॉइनस्टार मशिनने त्यांच्या सेवेसाठी ८९.१६ डॉलर्स इतकी प्रोसेसिंग फी कापून घेतली. त्यामुळे एली यांना शेवटी ५९७.४५ डॉलर्स (जवळपास ४९,००० रुपये) मिळाले. या कपातीनंतरही एली खूश होते आणि ते म्हणाले, “मला विश्वासच बसला नाही की मी इतक्या मोठ्या रकमेची बचत केली होती.” एली यांनी ही रक्कम त्यांचा आवडता छंद, विनाइल रेकॉर्डस् (जुने म्युझिक रेकॉर्डस्) खरेदी करण्यासाठी खर्च केली.


त्यांनी सांगितले, “मी काही रेकॉर्डस् विकत घेतले जे मला बऱ्याच काळापासून हवे होते. हे माझ्यासाठी एक छोटे पण संस्मरणीय बक्षीस होते.” एली यांनी त्यांच्या कॉईनस्टार पावतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी लिहिले, “१० वर्षे लागली; पण शेवटी माझी स्टार वॉर्स गुल्लक भरली.”

Comments
Add Comment

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक