उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

  103

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या महिन्याभरातच उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यात उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि ईशान्य मुंबईतील काही लोकसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आहेत.


जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या अनेक आमदारांनी आणि खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतही अशीच परिस्थिती दिसून आली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेत अनेक माजी नगरसेवकांनी उबाठा शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाला पाठिंबा दिला.


२०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अपक्ष, मनसेचे सहा आणि जात पडताळती अपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या जागी निवडून आलेल्या नगरसेवकांमुळे ही संख्या महापालिका विसर्जित होई पर्यंत १०२ वर पोहोचली होती. त्यातील दोन माजी नगरसेवक मृत पावल्याने ही संख्या १०० एवढी झाली होती. त्यातील आजमितीस ४८ ते ४९ उबाठाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोनच दिवसांपूर्वी शीव प्रतीक्षानगरमधील उबाठाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. रामदास कांबळे हे निष्ठावान शिवसैनिक मानले जात होते आणि कोणत्याही परिस्थितीत ते उबाठा शिवसेना सोडणार नाही अशी खात्री पक्षाच्या नेत्यांना होती. तसेच लोकसभा आणि विधानसभेतही पक्षासाठी त्यांनी झटून काम केले होते. पण कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उबाठाला मोठा धक्का बसला. असेच धक्के येत्या महिन्याभरात उबाठाला बसण्याची शक्यता आहे.


उबाठाकडे सध्या ५१ ते ५२ माजी नगरसेवक असून यातील दहा ते पंधरा माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यातील काही नगरसेवक हे भाजपातही जाऊ शकतात,असेही बोलले जाते. मात्र हे सर्व माजी नगरसेवक पक्षासाठी सध्या निष्ठावान म्हणून ओळखले जात असून सध्या ते पक्षात अशाप्रकारे सक्रीय आहेत की त्यांच्या पक्ष सोडण्यानंतर पक्षालाही आणि आसपासच्या पदाधिकारी आणि नेत्यांना धक्का बसू शकतो असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना पक्षावर आता विश्वास अधिक दृढ होवू लागला असून त्यामुळे बहुतांशी २०१२ आणि २०२७मधील माजी नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहे आणि त्यांचा प्रवेश पक्ष ठरवेल, त्याप्रमाणे करून घेतला जाईल,असेही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून बोलले जात आहे. आता प्रवेश केल्यास त्यांनी सुचवलेल्या विकासकामांना मंजुरी देऊन त्याप्रमाणे कामे करता येतील आणि त्याचे श्रेय त्या संबंधित लोकप्रतिनिधीला मिळेल. मागील तीन ते साडेतीन वर्षांमध्ये नगरसेवकांनी पाच वर्षांत केलेली कामे शुन्य झाल्याने आता त्यांना सत्ताधारी पक्षासोबत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतील प्रवेशाचे प्रमाण वाढलेले दिसून येईल,असेही बोलले जाते.

Comments
Add Comment

Maratha Andolan : मराठा आरक्षण आंदोलन पाचव्या दिवशीही कायम, जरांगे पाटील उपोषणावर ठाम

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस

"जरांगे शब्द जपून वापरा, आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी…" निलेश राणेंचा थेट इशारा

जरांगे विरुद्ध वादात निलेश राणे यांचा नितेश राणेंना थेट पाठिंबा  मुंबई: मनोज जरांगे हे आझाद मैदानात मराठा

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ

मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या

Manoj Jarange: न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगेनीही दिला आंदोलकांना दम, हुल्लडबाजी करणाऱ्यांना म्हणाले...

काही तासांत रोडवरील गाड्या मैदानात लावा, मैदानातच झोपा, त्रास होईल असं वागू नका, जरांगे यांचे आंदोलकांना

Chhagan Bhujbal: मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा; आमच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको

ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला, छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून १०