खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

  24

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष


मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी


सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे च्या माध्यमातून या वर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी रो - रो कार सेवेची सुरुवात केली जात आहे. मात्र आनंदाची बातमी अशी की, या रो - रो कार सेवेला कोलाड (रायगड) व वेर्णा (गोवा) हे थांबे निश्चित केले होते. परंतु आता मात्र या रो - रो सेवेला कणकवली तालुक्यातील नांदगाव रेलचे स्थानकात देखील थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे चाकरमानी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.


मुंबईतून रेल्वेतून कार घेऊन आलेल्या चाकरमान्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात नांदगाव येथे कार उतरता येणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती.


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे देखील या प्रश्नी समितीने लक्ष वेधले होते. कोकण रेल्वेची रो - रो कार सेवा कोलाड येथून दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. तर नांदगाव येथे रात्री १० वाजता ही रो रो कार थांबेल. तर नांदगाव येथून रात्री १२ वा. च्या सुमारास ही रो रो गोव्याच्या दिशेने प्रस्थान करणार असून वेर्णा येथे पहाटे ६ वाजता पोचणार आहे. परतीची रो - रो कार सेवा वेर्णा येथून दुपारी ३ वाजता निघेल. नांदगाव येथे ही रो रो कार गाडी रात्री ८ वाजता येईल आणि रात्री १०:३० वाजता मार्गस्थ होऊन कोलाड येथे पहाटे ६ वाजता पोचणार आहे.


रो - रो सेवेला सिंधुदुर्गात थांबा नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. या नाराजीची दखल घेत कोकण रेल्वेने नांदगाव स्थानकातही रो - रो सेवेला थांबा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील वाहनधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.