IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. गंभीर यांनी 'X' वर एक पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.


गंभीर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आम्ही काही सामने जिंकू, काही हरू... पण आम्ही कधीच हार मानणार नाही!" त्यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना "वेल डन बॉईज!" असे म्हटले आहे.


 


गंभीर यांची ही प्रतिक्रिया त्यांचा संघावर असलेला विश्वास दर्शवते. या विजयाने त्यांच्या रणनीतीचीही पुष्टी झाली आहे. काही क्रिकेट तज्ज्ञांनी गोलंदाजाऐवजी अतिरिक्त फलंदाजाला संधी देण्याच्या त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र गंभीर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ओव्हल कसोटीतील विजयाने त्यांच्या या भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे.


३७४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची धावसंख्या एकवेळ ३ बाद ३०१ इतकी होती. त्यावेळेस हॅरी ब्रूक आणि ज्यो रूट यांच्यात १९५ धावांची भागीदारी झाली होती. असे वाटत होते की सामना त्यांच्या ताब्यात आहे. मात्र यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने पाच आणि प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे