माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते.  दिल्लीतील आरएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते,  अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७९ वर्षांचे होते.


सत्यपाल मलिक यांनी गोवा, मेघालय, ओडिशा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.



सत्यपाल मालीक यांचा राजकीय प्रवास


सत्यपाल मलिक यांचा प्रवास सपामधून सुरु झाला होता, ते काही काळ भाजपमध्येही कार्यरत होते. मात्र, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्याने त्यांच्याकडे देशभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. सत्यपाल मलिक हे ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू काश्मीर राज्याचे शेवटचे राज्यपाल होते. त्यांच्या कार्यकाळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्यात आले आणि जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि त्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. योगायोगाने, आज या निर्णयाचा सहावा वर्धापन दिन आहे आणि याच दिवशी सत्यपाल मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ऑक्टोबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत बिहारचे राज्यपाल होते. २१ मार्च २०१८ ते २८ मे २०१८ पर्यंत त्यांना ओडिशाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला. जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतर, सत्यपाल मलिक यांची गोव्याचे १८ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ऑक्टोबर २०२२ पर्यंत मेघालयाचे २१ वे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले.



 
Comments
Add Comment

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात