गौतम अदानी यांच्या पदात फेरबदलासह अदानी पोर्ट्सचा निकाल जाहीर, कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात कोसळला !

मोहित सोमण: अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने (Adani Ports and Special Economic Zone Limited) ने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ६.५% वाढ निव्वळ नफ्यात (Net Profit) मध्ये नोंदवली आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंग मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षाच्या तिमाहीतील ३१०७.२३ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ३३१०.६० कोटींचा निव्वळ नफा मिळाला. निकालाखेरीज कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्यात पदावलीत (Designation) बदलण्यात आले असून ते आता कार्यकारी चेअरमन पदावर न राहता आता विना कार्यकारी चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळतील. कंपनीच्या संचालक मंडळाने या निर्णयाला मान्यता दिली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट पासून हा निर्णय लागू असेल.

कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३१% वाढ नोंदवली गेली. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला महसूल ६९५६.३२ कोटी होता जो वाढत या तिमाहीत ९२१६.१४ कोटी होता.कं पनीच्या बॉटम लाईन (Bottom Line) मध्ये मागील तिमाहीतील तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर ९.५% वाढले जे ३०२३.१० कोटीवर पोहोचले. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये १३% वाढ झाली. ज्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेतील ४८४८ को टींच्या तुलनेत यंदा तिमाहीत ५४९५ कोटींवर कमाई गेली आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, तिच्या लॉजिस्टिकस व्यवसायात महसूल २ पटीने वाढत ११६९ कोटींवर तर मरिन व्यवसायातील महसूल २.९ पटीने वाढत इयर ऑन इयर बेसिसवर ५४१ कोटींवर पोहोचला. निकाल जाहीर होताच कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारी २.१० वाजे पर्यंत २.१७% घसरण झाली असल्याने कंपनीचा समभाग १३५९.३० रुपयांवर गेला आहे.

कंपनीच्या घरगुती पोर्ट महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १४% वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय पोर्ट व्यवसायातून २२% वाढ झाली. त्यामुळे घरगुती पोर्ट महसूल ६१३७ कोटीवर व आंतरराष्ट्रीय पोर्ट महसूल ९७३ कोटीवर गेला आहे. आगामी काळात कंपनीच्या महसूलात १६ ते २२% वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात कंपनी ११ ते १२ हजार कोटींची भांडवली गुंतवणूक (Capital Expenditure) करू शकते.
Comments
Add Comment

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना