'दशावतार' सिनेमाचा टीझर रिलीज, दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट

मुंबई : ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आगामी 'दशावतार' या चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. झी स्टुडिओज, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

दर्जेदार कलाकारांचा संच
या चित्रपटात मराठीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. यामध्ये दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशा कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून त्यात भावना, रुढी-परंपरा, पारंपरिक लोककला आणि आधुनिक आव्हानांचा अनोखा संगम पाहायला मिळणार असल्याचं टीझरमधून दिसून येतं.

सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या मते, "दशावतार" ही कोकणातील मातीशी जोडलेली, पण जागतिक प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी कथा आहे. टीझरमध्ये दिसणारी कोकणातील सुंदर निसर्गदृश्ये, दशावतारी कला आणि घनदाट अरण्य यामुळे हा चित्रपट एक वेगळाच आणि भव्य अनुभव देईल अशी खात्री वाटते. निर्माते सुजय हांडे यांच्या मते, टीझरमध्ये चित्रपटाच्या भव्यतेची झलक दिसते आणि यामध्ये प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल. झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी म्हटलं की, 'बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची आवड बदलत आहे आणि हे लक्षात घेऊन आम्ही नवीन कथांना प्राधान्य देत आहोत.' 'दशावतार' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.