निवडणुका जाहीर होण्याआधीच सध्याच्या मतदार याद्या तपासून घ्या. जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी सोबत घ्या; असे निर्देश राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत बलवान आहे. यावेळी मुंबई महापालिकेवर आपलीच सत्ता येणार आहे. हे मी फक्त टाळ्या-शिट्ट्या मिळवण्यासाठी बोलत नाहीये. जुन्या-जाणत्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या, पक्षापासून दुरावले आहेत, त्यांना एकत्र करा आणि तयारीला लागा, असंही राज ठाकरे म्हणाल्याचं वृत्त आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर ?
जर आम्ही दोघं भाऊ वीस वर्षांनी एकाच मंचावर येऊ शकतो, तर तुम्हीही आपापसातले वाद बाजूला ठेवा आणि एकोप्यानं काम करा, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.