एचडीएफसी बँकेने जाहीर केला बोनस...

  16

डॉ. सर्वेश सुहास सोमण


आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीचा एचडीएफसी बँकेचा निकाल मागील महिन्यात जाहीर झाला. एचडीएफसी बँकेनं गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत १२.२४ टक्के अधिक नफा मिळवला आहे. बँकेला पहिल्या तिमाहीत १७,३८५ कोटींचा नफा मिळेल अशी अपेक्षा होता, तर बँकेचं स्टँडअलोन नेट इंटरेस्ट इन्कम ५.४ टक्क्यांनी वाढून ३१,४३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


एचडीएफसी बँकेचं ऑपरेटिंग प्रॉफिटदेखील चांगलं राहिलं. या तिमाहीत ते ३५,७३४ कोटी रुपयांवर पोहोचले. प्रोविजन्समध्ये देखील वाढ पाहायला मिळाली. ते १४,४४२ कोटी रुपयांवर पोहोचलं. यामध्ये ९ हजार कोटींच्या फ्लोटिंग प्रोविजन्स आणि १७०० कोटींच्या कंटिंजेंट प्रोविजन्सचा समावेश आहे.


दुसरीकडे बँकेने शेअरधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बँकेच्या बोर्डानं प्रतिशेअर ५ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. याशिवय १:१ बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.


एचडीएफसी बँक १:१ बोनस इश्यू
शेअरहोल्डर्सना १ रुपयांच्या प्रत्येक १ (एक) पूर्ण भरलेल्या इक्विटी शेअरसाठी प्रत्येकी १ रुपयांचा एक इक्विटी शेअर मिळेल. रेकॉर्ड डेटपूर्वी ज्या सदस्यांकडे शेअर असेल ते बोनस जारी करण्यास पात्र असतील. एचडीएफसी बँकेच्या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट २७ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, संचालक मंडळाने मंजुरी दिल्यापासून २ (दोन) महिन्यांच्या आत म्हणजेच १८ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी बोनस जमा होण्याची अंदाजे तारीख आहे.


बँकेची सहायक कंपनी एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या आयपीओतून देखील चांगला फायदा झाला आहे. आयपीओतून बँकेला करपूर्व नफा ९,१२८ कोटी रुपयांचा झाला. ऑफर फॉर सेलद्वारे विकलेल्या शेअरमधून बँकेला नफा झाला. एका वर्षाच्या तुलनेत नफा थोडा कमी होऊन तो १६,२५८ कोटी रुपयांवर आला. जो गेल्या वर्षीच्या तिमाहीत १६,४७५ कोटी रुपये होता. एचडीएफसी बँकेचा शेअर २,०१२ रुपयांवर आहे.


मागील काही महिन्यापासून निर्देशांकात घसरण सुरू आहे. मागील आठवड्यात ही घसरण कायम राहिली. पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची २४४७० ही अत्यंत महत्त्वाची आधार पातळी असून जर ही पातळी तुटली, तर निर्देशांकात आणखी मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे वरील टेक्निकलं पातळी लक्षात घेऊन शिवाय सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार युद्ध बघता त्यानुसार योग्य नियोजन करून मर्यादित जोखीम घेऊन व्यवहार करणे अपेक्षित आहे.


(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सूचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सूचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

Comments
Add Comment

‘टॅरिफ’चा बडगा, की आत्मनिर्भरतेसाठी संधी?

प्रा. नंदकुमार काकिर्डे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी घोषणा करून भारतातून निर्यात होणाऱ्या

अर्थव्यवस्थेसाठी ‘हम दो हमारा एक’च पाहिजे!

मोहित सोमण रघुनाथ धोंडों कर्वे! देशातील लोकांनी विसरलेल्या नावापैकी आणखी एक नाव... त्यांच योगदान सुवर्ण अक्षरात

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लवकरच होणार लागू

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि

Gold Rate Today: सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात त्सुनामी जाणून घ्या आजच्या सोन्याचे दर !

मोहित सोमण: सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात 'त्सुनामी' आली आहे. सध्या सोन्यात प्रामुख्याने बाजारातील अस्थिरतेचा

EPFO: आता ईपीएफओचे पैसै काही मिनिटात काढा !

प्रतिनिधी: आता तुमच्या ईपीएफओ खात्यातून पैसे काढणे खूप सोपे होणार आहे. सगळ्या पूर्वीच्या क्लिष्ट प्रकिया व पैसे

घोटाळेबाज जेन स्ट्रीटकडून तपासात अडथळे सुरूच

प्रतिनिधी: जेन स्ट्रीटकडून नियामक मंडळांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्याचे सुत्रांनी