इयर टू डेट (Year to date) बेसिसवर जीएसटी संग्रहणात १०.७% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या याच जुलै महिन्यात संग्रहण ७.३९ लाख कोटी होते ते वाढत या जुलैपर्यंत ८.१८ लाख कोटींवर गेले आहे. घरगुती महसूलात ६.७% वाढ झाली असून ती वाढ १.४३ लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर जीएसटी परतावा (Refund) माध्यमातून इयर ऑन इयर बेसिसवर ६६.८% वाढ झाल्याने संग्रहण परतावा २७१४७ कोटींवर पोहोचला. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनात १२.६% वाढ झाली जी २.३७ लाख कोटींच्या रेकॉर्ड ब्रेक वाढीसह सरकारने नोंदवली होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने आगामी वर्षात ११% वाढ होईल असे सूतोवाच केले होते.
सरकारच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलैमध्ये निव्वळ जीएसटी महसूल १,६८५८८ कोटी होता जो जुलै २०२४ मध्ये १६५८०० कोटी होता, त्यात जुलैत १.७% वाढ झाली आहे. ही मंदावलेली वाढ मुख्यत्वे एकूण परताव्यात ६६.८% वाढ झाल्यामुळे झाली, जी जुलै २०२५ मध्ये गेल्या वर्षीच्या १६,२७५ कोटी होती, जी वाढून २७,१४७ कोटी झाली आहे. माहितीनुसार मासिक वाढीची मंदी असूनही एप्रिल-जुलै २०२५ साठी एकत्रित निव्वळ जीएसटी महसूल ८.४% वाढून ७.११ लाख कोटी झाला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधी तील ६.५६ लाख कोटी होता. त्यामुळे जीएसटीतील वाढ समाधानकारक असल्याचे म्हटले जात आहे.