झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. शिबू सोरेन यांच्यावर दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात मागील एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून उपचार सुरू होते. तिथेच शिबू सोरेन यांनी अखेरचा श्वास घेतला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत शिबू सोरेन यांनी वडिलांच्या निधनाचे वृत्त एक्स पोस्ट करुन दिले.

शिबू सोरेन यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात जूनच्या शेवटच्या आठवड्यात दाखल केले होते. अनुभवी डॉक्टर शिबू सोरेन यांच्यावर उपचार करत होते. उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी शिबू सोरेन यांनी अखेरचा श्वास घेतला. शिबू सोरेन यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक प्रकट केला. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी फोनवरुन बातचीत केली.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक्स पोस्ट केली त्यात ‘ आदरणीय दिशोम गुरुजी हम सभी को छोड़कर चले गए हैं। आज मैं शून्य हो गया हूं...।’ असा संदेश नमूद आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रक काढून झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सकाळी आठ वाजून ५६ मिनिटांनी निधन झाल्याचे जाहीर केले. किडनीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या सोरेन यांना दीड महिन्यांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. ते सुमारे एक महिना लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. डॉक्टरांची एक टीम आयसीयूमध्ये सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून होती.

शिबू सोरेन तीन वेळा झाले झारखंडचे मुख्यमंत्री

आदिवासी नेते शिबू सोरेन यांनी ३८ वर्षांहून अधिक काळ झारखंड मुक्ती मोर्चाचे नेतृत्व केले. त्यांनी झारखंड राज्यासाठी दीर्घ आंदोलन केले आणि तीनदा झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांनी २ मार्च २००५ रोजी पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे १२ मार्च २००५ रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. पहिल्यांदाच ते फक्त १० दिवस मुख्यमंत्री राहू शकले. दुसऱ्यांदा ते २७ ऑगस्ट २००८ रोजी मुख्यमंत्री झाले आणि १९ जानेवारी २००९ पर्यंत या पदावर राहिले. तिसऱ्यांदा त्यांनी ३० डिसेंबर २००९ रोजी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १ जून २०१० पर्यंत राहिले.

शिबू सोरेन आठ वेळा लोकसभेचे खासदार आणि तीन वेळा राज्यसभेचे खासदार

शिबू सोरेन हे आठ वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. ते तीन वेळा राज्यसभेचे खासदारही होते. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले होते. ते झारखंडच्या राजकारणातील सर्वात मोठे व्यक्तिमत्व होते आणि देशाच्या राजकारणात त्यांचा प्रभाव होता. झारखंडमध्ये त्यांना दिशाम गुरु (देशाचे गुरु) म्हटले जात असे.

शिबू सोरेन यांचे निधन, तीन दिवसांचा दुखवटा

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे संस्थापक संरक्षक दिशाम गुरु शिबू सोरेन यांच्या निधनानंतर, झारखंड सरकारने तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. हा शोककाळ ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत लागू असेल. या काळात, झारखंड मधील सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकेल आणि कोणताही सरकारी कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. तसेच शिबू सोरेन यांच्या सन्मानार्थ झारखंड सरकारने ४ आणि ५ ऑगस्ट रोजी सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments
Add Comment

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या