"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात आले


मुबई: हिंदीच्या छोट्या पडद्यावरची सुप्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यला ७ महिन्याचा गोंडस मुलगा आहे. तिच्या सोशल मीडिया साईटवर तिने आपल्या पती आणि बाळासोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. मात्र या फोटो तसेच व्हिडिओजना काही लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. त्यांपैकी काहींनी तर तिच्या ७ महिन्यांच्या बाळाच्या त्वचेच्या रंगावरूनही ट्रोल केले. ज्यामुळे देवोलीनाचा प्रचंड संताप झाला, आणि तिने ट्रोलर्सना धडा शिकवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध थेट कायदेशीर कारवाई केली.   

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांना तिच्या बाळाचा चेहरा सोशल मीडियाद्वारे दाखवला होता. ज्यावर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला. मात्र, काही नकारात्मक मानसिकतेच्या लोकांनी देवोलीनाच्या बाळाला त्याच्या त्वचेच्या रंगावरून ट्रोल करायला सुरुवात केली. जे देवोलीनाला सहन झाले नाही. 

ट्रोलर्सने ७ महिन्यांच्या बाळालादेखील सोडले नाही!


देवोलीना भट्टाचार्यजीच्या ७ महिन्यांच्या बाळाला त्याच्या त्वचेच्या रंगामुळे ट्रोल करण्यात आले. त्यामुळे देवोलीनाने या सर्व ट्रोलर्सच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

सध्या काय करते देवोलीना भट्टाचार्य?


सध्या, देवोलीना तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तिने जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी काही वर्षांपूर्वी लग्न केले. आता ती एका मुलाची आई आहे.  आजकाल ती तिच्या मुलाच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. तिने कामापासून ब्रेक घेतला आहे. बऱ्याच काळापासून ती कोणत्याही डेली सोपमध्ये दिसली नाही. अलिकडेच ती लाफ्टर शेफ २ च्या एका भागात दिसली होती.  देवोलीना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती प्रत्येक मुद्द्यावर तिचे स्पष्ट मत देताना दिसते.

ट्रोलर्सला फटकारले 


देवोलीनाने आपल्या मुलाचे नाव जॉय ठेवले आहे. जॉयच्या जन्मानंतर काही महिन्यांनी देवोलीनाने त्याची गोंडस झलक आपल्या फॅन्ससाठी शेअर केली होती. ज्याला ट्रोल करण्यात आले. तिच्या बाळाच्या त्वचेच्या रंगामुळे त्याला ट्रोल केले जाऊ लागले. त्यामुळे देवोलिनाने ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर ट्रोलर्सचे इंस्टाग्राम अकाउंट शेअर केले आणि त्यांना फटकारले. यासोबतच देवोलिनाने ट्रोलर्सवर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला.

देवोलिनाने सांगितले की, तिने सायबर क्राईममध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिने सायबर क्राईम टीमसोबत झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट देखील सोशल मिडियावर शेअर केले.

देवोलिनाने लिहिले - ट्रोलर्सना त्यांच्या लायकीचीच वागणूक द्या. त्यांनी माझ्या ७ महिन्यांच्या मुलाला त्याच्या वर्णाबद्दल आणि माझ्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल ट्रोल केले आहे." तिच्या या धडक कारवाईनंतर अनेक ट्रोलर्सनी त्यांचे अकाउंट डिलीट केले आहेत. 
Comments
Add Comment

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत