ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . पीडित तरुणीने इंस्टाग्रामवर 'कॅश लोन' नावाच्या मोबाईल ॲपची जाहिरात पाहून कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्यानंतर तिची आर्थिक फसवणूक झाली . हे प्रकरण एवढ्या वर थांबले नाही तर तिला बदनाम करण्याच्या धमक्याही मिळू लागल्या. या संपूर्ण प्रकरणामुळे पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला आहे .


जोगेश्वरी पश्चिममधील सुलतानाबाद चाळीतील क्रांती नगर परिसरात कुटुंबासह राहणाऱ्या पीडितेने इंस्टाग्रामवर “कॅश लोन” नावाच्या ॲपची जाहिरात पाहिली. तिला तातडीने पैशांची गरज असल्यामुळे तिने २० जुलै २०२५ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास हे ॲप डाउनलोड केले. पीडितेने ॲपवर तिची सर्व वैयक्तिक माहिती, आधार कार्ड आणि बँकेचे डिटेल्स शेअर केले. तिने कोटक महिंद्रा बँकेचे खाते नंबर देऊन 2000 रुपयांचे कर्ज मागितले. त्यातून तिला फक्त 1300 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. हे कर्ज तिला सहा दिवसांसाठी दिले गेले .


परंतु कर्जाची मुदत संपण्याआधीच पीडितेला मोबाईलवरून धमक्यांचे मेसेज येऊ लागले. सदर आरोपीने तिला सांगितले की, जर तिने लगेच पैसे परत केले नाहीत, तर तो तिचे अश्लील फोटो बनवून सोशल मीडियावर व्हायरल करेल. या भीतीपोटी पीडितेने ३१ जुलै रोजी संध्याकाळी दोन टप्प्यांत प्रत्येकी १००० रुपये, असे एकूण २००० रुपये UPI द्वारे पाठवले. हे पैसे फोनपेवर 'संदेश कुमार' नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाले.


त्यानंतर पीडितेच्या मावशीने फोन करून सांगितले की, त्यांना व्हॉट्सॲपवर पीडितेच्या चेहऱ्याचे मॉर्फ केलेले एक नग्न छायाचित्र पाठवण्यात आले आहे. काही वेळातच पीडितेच्या आणखी दोन मित्रांनाही त्याच नंबरवरून हे फोटो पाठवण्यात आले. या मानसिक आघातानंतर पीडितेने आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला आणि ते पोलीस ठाण्यात पोहोचले.


या प्रकरणी पोलिसांनी सदर आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. तसेच सदर ॲपवरून किंवा इतर ऑनलाईन साईटद्वारे कुठल्याही प्रकारचे लोन ना घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे .

Comments
Add Comment

मतदानाला जाताना ओळखीच्या पुराव्यांपैंकी एक पुरावा बाळगा जवळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर

मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?

मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या

मुंबईतील ८५ लाख मतदारांना झाले मतदार ओळखपत्रांचे वाटप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी

मुंबईत मतदान केंद्रासह परिसरही राखणार स्वच्छ

पुढील तीन दिवसांमध्ये राखली जाणार स्वच्छता मोहिम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ?

मुंबई : हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ किंवा १५

मकरसंक्रांतीचे महत्त्व सांगणारे मुलांसाठीचे भाषण

मुंबई : 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा प्रेमळ संदेश देत नात्यात गोडवा निर्माण करणारा हा सण. समाजातील एकतेची आणि