उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर


ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा प्रभाग क्रमांक १७३चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज ठाणे येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा हाती. देत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिंदे यांनी त्यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर केली.


रामदास कांबळे यांच्यासह, शाखा संघटीका नंदा बापू शाहू, उपशाखा संघटीका नंदा पाटसुभे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खेडपकर, देविका नायर आणि सर्व पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश झाला. यासोबत रेखा तिवारी, मालन सावंत, लक्ष्मी कोतवाल, अनिता सावंत, अपूर्वा पालव, युवासेना अधिकारी सचिन पडवळ, सहार येले, विनोद शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना शिंदे यांनी, मुंबईतील अनेक माजी लोकप्रतिधी आजही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. पक्षप्रवेशांचा ओघ अद्यापही कमी झालेला नाही याचा नणंद व्यक्त केला. तसेच रामदास कांबळे यांच्या मतदारसंघात संक्रमण शिबिरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यातील बहुतांश प्रश्न हे म्हाडा आणि एसआरए प्राधिकरणाची संबंधित आहेत, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते शिवसेनेसोबत आले असून शासनाच्या माध्यमातून हे प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू असे यावेळी जाहीर केले.


गेल्या अडीच वर्षाचा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात, काँक्रिट रस्ते, मुंबईचे सुशोभिकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कॅशलेस वैद्यकीय सेवा, डीप क्लीन ड्राइव्ह असे अनेक उपक्रम आपण शहरात राबवले. कोस्टल रोड, अटल सेतू, महालक्ष्मी रेस्कोर्सच्या जागेवर तयार होणारे सेंट्रल पार्क असे अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्याद्वारे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला असून मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी अम्ही काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू असे यावेळी बोलताना नमूद केले. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर, आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास

ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास

ठाणे ‘सिव्हिल’ने तरुणीला दिले नवे आयुष्य

अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण