सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप


वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे गुन्हेगार देखील मारले गेले आहेत. दहशतवाद्यांना मारण्यासाठी तुम्हाला फोन करून विचारायचे का? त्यांना पळून जाण्याची संधी द्यायची का?, अशा थेट आणि बोचऱ्या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वाराणसी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत २,१८३ कोटी रुपयांच्या ५२ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. या प्रकल्पांमध्ये रस्ते बांधकाम आणि रुंदीकरण, रुग्णालयांचे आधुनिकीकरण, शैक्षणिक संस्थांमध्ये सुधारणा, धार्मिक पर्यटनासाठी पक्क्या घाटांचे बांधकाम, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज आणि पार्किंग सुविधांचा विस्तार, तलावांचे नूतनीकरण, ग्रंथालये आणि प्राणी रुग्णालयांची स्थापना अशा कामांचा समावेश आहे.


पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधितही केले. मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना ठार मारण्याच्या वेळेवरून अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पंतप्रधान मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरनंतर मी प्रथमच वाराणसीला आलो आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना मी बाबा विश्वनाथ यांच्याकडे केली होती.


त्यावेळी मी हल्ल्याचा बदला घेण्याचे वचन दिले होते. ते वचन मी पूर्ण केले आहे. ऑपरेशन सिंदूर हे काशी विश्वेश्वराला समर्पित असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना