Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार


Rani Mukherji Reaction on First national Award: राणी मुखर्जीला तिच्या अभिनय कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. या खास प्रसंगी, राणी मुखर्जीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राणी म्हणते की तिच्या ३० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीची मेहनत फळाला आली. हा सन्मान मिळाल्याने ती खूप आनंदी आहे.



'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जीने व्यक्त केला आनंद


७१ वा राष्ट्रीय पुरस्कार: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची अधिकृत यादी काल १ ऑगस्ट रोही जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अनेक कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ज्यात अशीही काही नावे आहेत, जी आश्चर्यचकित करणारी होती. मात्र, त्यापैकी एक नाव असे होते जे सोशल मीडियावर पाहून सर्वांना आनंद झाला. अभिनेत्री राणी मुखर्जीला तिच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येणार आहे.


राणी गेल्या ३० वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावत आहे. तिला अनेक पुरस्कार मिळाले, मात्र राष्ट्रीय पुरस्काराने तिला नेहमीच हुलकावणी दिली. मात्र, आता इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणानंतर, तिला तिच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, ज्याबद्दल ती खूप आनंदी आहे. राणीने त्याबद्दल आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे,



राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जीची प्रतिक्रिया


ती म्हणते, 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटातील माझ्या अभिनयासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, ज्यामुळे मी खूप आनंदी आणि तितकीच भावनिक झाले आहे. योगायोगाने, माझ्या ३० वर्षांच्या कारकिर्दीतील हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. एक अभिनेत्री म्हणून, मला अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि प्रेक्षकांनी देखील माझ्यावर भरभरून प्रेम केले. 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटातील माझ्या कामाचा सन्मान केल्याबद्दल मी राष्ट्रीय पुरस्कार ज्युरींचे आभार मानते. मी हा आनंद चित्रपटाच्या संपूर्ण टीमला, माझे निर्माते निखिल अडवाणी, मोनिषा आणि मधू, माझे दिग्दर्शक असीमा छिब्बर आणि आईची ताकद दाखवणाऱ्या या विशेष प्रकल्पात काम करणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. माझ्यासाठी, हा पुरस्कार माझ्या ३० वर्षांच्या कामाची, माझ्या कठोर परिश्रमाची आणि चित्रपट उद्योगावरील माझ्या प्रेमाची एक ओळख आहे.'



पुरस्कार जगातील सर्वोत्कृष्ट मातांना समर्पित


'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार तिच्यासाठी खूप खास का आहे हे राणीने पुढे स्पष्ट केले. ती म्हणाली, 'मी माझा राष्ट्रीय पुरस्कार जगातील सर्वोत्कृष्ट सर्व मातांना समर्पित करते. आईचे प्रेम आणि तिच्या मुलांना वाचवण्यासाठी तिची पराकाष्ठा खूप मोठी असते. या चित्रपटात, एका भारतीय आईने तिच्या मुलांसाठी संपूर्ण देशाशी लढा दिला, ही कहाणी मला खूप भावली.'



'मर्दानी ३' द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला


राणी मुखर्जी लवकरच तिचा हिट चित्रपट फ्रँचायझी 'मर्दानी' च्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. तिचा 'मर्दानी ३' हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, ती शाहरुख खानसोबत 'किंग' या चित्रपटातही काम करत आहे, जो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे, ज्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण काही काळापूर्वीच सुरू झाले आहे.

Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी