Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यात सुरू झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील अखल जिल्ह्यातील जंगली भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. ही चकमक शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झाली. जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे या भागात शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांकडून कारवाई करण्यात आली.





रात्रीभर सुरू राहिलेला गोळीबार


भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडियावर म्हंटले, “रात्रीभर अधूनमधून आणि तीव्र गोळीबार सुरू होता. सतर्क जवानांनी काळजीपूर्वक प्रत्युत्तर देत भागात घेराव घट्ट करत ठेवला आणि संपर्क कायम ठेवत एका दहशतवाद्याला ठार मारले.”







दहशतवाद्यांची संख्येची शक्यता


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात ४ ते ५ दहशतवादी लपलेले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यामुळे अद्याप शोधमोहीम पूर्णतः थांबलेली नाही. अधिक दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा दलांकडून संपूर्ण परिसरात शोध सुरू आहे.



आठवड्यातील दुसरी मोठी चकमक



यापूर्वी ३० जुलै रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला होता. लष्कराच्या जवानांनी दोन सशस्त्र दहशतवाद्यांना ठार मारले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चकमकीत मारले गेलेले हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेचे लष्कर-ए-तैय्यबाचे सदस्य असल्याचे मानले जात आहे. या चकमकीच्या दोन दिवस आधी, सुरक्षा दलांनी श्रीनगरमधील जंगलात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. बुधवारी करण्यात आलेले शिवशक्ती नावाचे ऑपरेशन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या योजनांना मोठा धक्का असल्याचे लष्कराने म्हटले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहेत.
Comments
Add Comment

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक

Middle East War : इराण-इस्रायल युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, १० सैनिकही जखमी!

कुवेत सिटी : मध्य-पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक व्यापक आणि हिंसक बनत चालला आहे. या

Shabbir Ahmed Lone LeT Terrorist Arrest : लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईंड जेरबंद, लाल किल्ला हादरवण्याचा मोठा कट उधळला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत