पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात शरद पवार समर्थक रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर याला अटक झाली. कोर्टाने प्रांजलची  न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली. ही भेट पक्ष संघटनेतील कामाबाबत होती, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. अधिवेशन काळात शरद पवारांसोबत काही मुद्यांवर चर्चा राहून गेली होी. याच कारणामुळे संघटनेशी संबंधित कामांसाठी मार्गदर्शन घेण्याकरिता शरद पवारांना भेटल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या.

प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि अद्याप त्याने जामिनासाठी अर्ज केलेला नाही. ही संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया आहे. यावर न्यायालयाबाहेर बोलणे योग्य होणार नाही; असे सांगत रोहिणी खडसेंनी प्रांजलबाबतच्या मुद्यावर प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. योग्य वेळी योग्य ठिकाणीच या विषयावर बोलेन, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.

पुणे पोलीस आयुक्तालयात रोहिणी खडसे आणि प्रांजल यांची भेट झाली. रोहिणी यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली. यानंतर रोहिणी खडसेंनी शरद पवारांशीही वेळ मागून घेऊन चर्चा केली. यामुळे प्रांजल प्रकरणात पुढे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व