MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात निर्देश दिले.


महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील २१५२ विद्यार्थ्यांना परीक्षेत नियमभंग केल्याच्या कारवाईत त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते.


महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील परीक्षा AI आधारित Proctored तंत्रज्ञान वापरून MCQ स्वरूपात घेण्यात आल्या. ७ जुलै २०२५ रोजी परीक्षा संपल्यानंतर १७ जुलै २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या सत्रात ३६,२०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २१५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमभंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. त्यापूर्वी झालेल्या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना AI सुरक्षा व Proctored प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र, असे असतानाही परीक्षेत नियमभंग झाल्याचे आढळून आले होते. मंडळामार्फत प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. केवळ नियमभंग या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. त्यानुसार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी पुरवणी परीक्षा आयोजित केली जात आहे. राखीव निकाल असलेले व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना ही विशेष संधी दिली जात आहे.


यापूर्वी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सैद्धांतिक परीक्षा पारंपरिक स्वरुपात घेतल्या जात होत्या. या परीक्षांच्या निकालासाठी सुमारे २ महिने लागत होते. विद्यार्थ्यांचा वेळ वाचवा यासाठी मंडळाने अत्याधुनिक AI Proctored तंत्रज्ञान वापरून या परीक्षा MCQ स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला होता. पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जात असून यासंदर्भात मंडळामार्फत विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.

Comments
Add Comment

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या