Dattatray Bharne : कृषीमंत्री होताच मामांचा ‘बारामती बॉम्ब’! दत्तात्रय भरणेंनी घेतला ठोस संकल्प

मुंबई : रमी खेळणे अंगलट आले असले तरी माणिकराव कोकाटे यांच्यावरील संकट खातेबदलावर निभावण्यात आलं. अजितदादांचे विश्वासू दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची अपेक्षेप्रमाणे चांगलीच लॉटरी लागली. सध्या ते राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून नियुक्त झाले असून, यापूर्वी त्यांनी क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी सांभाळली आहे. कृषी मंत्री खात्याची जबाबदारी मिळताच भरणे मामांनी पहिली प्रतिक्रिया दिली. शेतकरी कुटुंबात जन्मलेले भरणे यांचा राजकीय प्रवास खडतर आहे. यापूर्वी क्रिडामंत्री असल्यामुळे त्यांचा हा प्रवास खेळाच्या मैदानापासून आता थेट शेतापर्यंतचा असेल, ज्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी थेट जोडले गेले आहे. त्यांनी बारामतीचे नाव घेत पहिला फैसला पण जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे इंदापूरकरांच्या उत्साहाला भरते आले आहे. काय आहे तो निर्णय?





मामा भरणे यांनी मानले आभार


दत्तात्रय भरणे यांनी आज सकाळीच, एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषिखातं मिळते यासारखा आनंद कुठला असू शकतो असा आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले. या सर्वांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकल्याचे ते म्हणाले. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खातं मिळतं, यापेक्षा दुसरा कुठला आनंद असू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.



कृषी खात्याचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खाते बदल करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. आता कर्जमाफीची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, अजून या खात्याचा आपण पदभार स्वीकारला नाही. कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही मंडळी योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.




इंदापूर करणार बारामतीसारखं


आज कृषीमंत्र्याची जबाबदारी मिळताच दत्तात्रय भरणे यांनी पहिला संकल्प सोडला. त्यांनी त्यांचे इंदापूर विषयीचे प्रेम व्यक्त केले. त्यांचा मनोदय व्यक्त केला. “मी शेतकरी कुटुंबातील असून मला बारामतीकरांनी (अजितदादांनी) भरभरून दिलं. पवार कुटुंबाचं माझ्यावर भरभरून प्रेम राहिलं आहे. विशेषतः अजितदादांनी भरभरून दिले. आता इंदापूर बारामतीसारखं कसं होईल यासाठी प्रयत्न करणार.” असा मनोदय दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. बारामतीसारखी इंदापूरची प्रगती साधण्याचा संकल्प त्यांनी सोडला.



शेतकरी कर्जमाफी होणार का?


शेतकरी कर्जमाफी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संवेदनशील आणि चर्चेचा विषय आहे. दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. भरणे यांनी आपल्या प्रारंभिक वक्तव्यात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आणि नाविन्यपूर्ण शेती उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे. मात्र, कर्जमाफीच्या बाबतीत अद्याप कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही.




Comments
Add Comment

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व