Stocks: ९ दिवसात परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून २७००० कोटींचे शेअर केले ओम फट स्वाहा !

  61

मोहित सोमण:परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या ९ दिवसात २७००० कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातून काढून टाकली आहे. बाजारातील आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांनी भारतीय शेअर बाजारातून २९००० कोटींची रोख विक्री बीएईत व एनएसईत केली आहे. एक्सचेंज मधील डेटानुसार केवळ कालच्या सत्रातच परदेशी गुंतवणूकदारांनी ५६०० कोटींहून अधिक विक्री झाली आहे. भारतीय व जागतिक स्थितीतील कडूपणा, अस्थिरतेचा परिपा क म्हणून ही घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. इतकेच नाही तर भारतीय बाजारपेठेत २५% टेरिफ युएसने लावल्यावर काही क्षेत्रीय निर्देशांकातही सातत्याने घसरण सुरु आहे. केवळ निफ्टीचा विचार केल्यास एफ अँड ओ (Future and Options) यामध्ये ३% पेक्षा अधिक घसरण जुलै महिन्यात झाली. तर सेन्सेक्स एफ अँड ओ निर्देशांकात २% पेक्षा अधिक घसरण झाली आहे. विशेषतः डॉलर निर्देशांकात होणारी वाढ पाहता परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा इतर जागतिक बाजारात वळवला. रूपयांची सातत्याने होणारी घसरणही बाजाराला घातक ठरली आहे.


या परदेशी गुंतवणूकदारांच्या घडामोडीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले,' जुलैमध्ये निफ्टीमध्ये ३.१% घसरण झाल्यानंतर ऑगस्ट मालिकेची सुरुवात कमकुवत झाली आहे.नजीक च्या काळात बाजारावर टेरिफशी संबंधित बातम्यांचा प्रभाव पडेल. सुधारित टेरिफ दरांच्या अंमलबजावणीची तारीख ७ ऑगस्ट असल्याने, देशांना वाटाघाटी करण्यासाठी आणि टेरिफ कमी करण्यासाठी वेळ मिळतो. ते घडू शकते. कालच्या बाजारातील कृतीव रून असे दिसून येते की बाजार २५% टेरिफला अल्पकालीन समस्या म्हणून पाहतो. या महिन्यापासून सुरू होणाऱ्या वाटाघाटींच्या पुढील फेरीनंतर हा दर कमी होण्याची शक्यता आहे.बाजारातील एक महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे व्यापक बाजारपेठेतील कमकुवतपणा, विशेषतः स्मॉलकॅप्स... या सेगमेंटच्या उच्च मूल्यांकनांमुळे हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. एफआयआयकडून सतत विक्री होत राहणे नकारात्मक आहे. डॉलर निर्देशांक १०० पर्यंत वाढल्याने एफआयआय विक्री सुरू ठेवण्यास प्रवृत्त होतील आणि लार्ज कॅप्सवरही दबाव येईल. गुंतवणूकदार वाटा आणि पाहण्याची रणनीती स्वीकारू शकतात.'


याशिवाय तिमाही निकालांच्या कमकुवत कामगिरीचा फटका बाजारात बसला होता. विशेषतः आशियाई बाजारातील टेरिफचा फटका बसला असताना जपान व्हिएतनाम यांसारख्या देशांवर माफक टेरिफ लागल्याने मात्र इतर देशांच्या लेखी अस्थिरता वाढली. भारतावर २५% टेरिफ जाहीर केल्यानंतर आता भारतीय गुंतवणूकदादेखील नव्या गुंतवणूकीत उत्साही दिसत नाहीत. यामुळे आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार काय प्रतिसाद देतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एफपीआयनी (FPI)ने इंडेक्स शॉर्ट्सम ध्ये लक्षणीय वाढ केली आहे. तर त्यांनी सिंगल-स्टॉक फ्युचर लॉन्ग कमी केले आहेत. इंडेक्सच्या बाबतीत, जुलै मालिकेच्या सुरुवातीला त्यांचे नेट शॉर्ट्स ३५००० शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट्सच्या तुलनेत १३८००० कॉन्ट्रॅक्ट्स होते. सिंगल स्टॉक फ्युचर्सच्या बाबतीत, जुलै मालिके च्या सुरुवातीला त्यांचे नेट लॉन्ग १५९७००० नेट लॉन्ग कॉन्ट्रॅक्ट्सच्या तुलनेत १३३९०००० कॉन्ट्रॅक्ट्स होते.


तांत्रिक बाबीबद्दल होताना तज्ञांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे की, 'एचएनआय आणि रिटेलने एसएसएफ लॉन्ग जोडताना इंडेक्समध्ये लॉन्ग्स जोडले. जुलै मालिकेच्या सुरुवातीला त्यांचे नेट लॉन्ग्स १९००० नेट लॉन्ग कॉन्ट्रॅक्ट्सच्या तुलनेत १०४००० कॉन्ट्रॅक्ट्स होते. एसएसएफमध्ये,जुलै मालिकेच्या सुरुवातीला त्यांचे नेट लॉन्ग्स १८९९००० नेट लॉन्ग कॉन्ट्रॅक्ट्सच्या तुलनेत २१७९००० कॉन्ट्रॅक्ट्स होते.' गेला मागील आठवड्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली मोठी गुंतवणूक काढून घेतली. घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे गुणोत्तर १० पातळीवर आल्याने ही घसरण कायमच होती. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील वाढत असलेल्या हालचालींचा फटकाही बाजारात बसत आहे. त्यामुळे टेक्निकल पोझिशन बघता ही वाढ तूर्तास कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

मतदार यादीतून माझे नाव गायब होऊ शकते तर..., तेजस्वी यादवच्या या आरोपावर निवडणूक आयोगाचे आले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारच्या मतदार यादीतून तेजस्वी यादव यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. पाटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Gold Rate Today: सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात त्सुनामी जाणून घ्या आजच्या सोन्याचे दर !

मोहित सोमण: सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात 'त्सुनामी' आली आहे. सध्या सोन्यात प्रामुख्याने बाजारातील अस्थिरतेचा