राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू

मुंबई : सरकारने आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आरक्षण उपसमितीने याबाबत केलेल्या शिफारशीनंतर ही बिंदूनामावली निश्चित करण्यात आली आहे.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांसाठी सुधारित आरक्षण विहित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषीमत्री माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक ऊईके आदींचा समावेश होता. या उपसमितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.

या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ही आरक्षण बिंदूनामावली लागू करण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमधील इतर मागास वर्ग, तसेच विमुक्त जाती/भटक्या जमाती या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी आणि लोकसंख्या विचारात घेऊन गट-क आणि गट-ड संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर या सुधारित आरक्षणानुसार बिंदूनामावली देखील विहित करण्यात आली होती. राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) प्रवर्गास शासकीय सेवेतील सरळसेवा पदभरतीस तसेच शैक्षणिक संस्थांतील प्रवेशास १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांसाठी आरक्षण : नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर या प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित जातींसाठी १०% , अनुसूचित जमातींसाठी २२% , विमुक्त जाती (अ) साठी ३% , भटक्या जमाती (ब) साठी २.५% , भटक्या जमाती (क) साठी ३.५% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १५% , एसईबीसीसाठी ८% , ईडब्ल्यूएससाठी ८% आणि खुला प्रवर्गासाठी २४% आरक्षण विहित करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यासाठी आरक्षण : यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १२% , अनुसूचित जमातींसाठी १४% , विमुक्त जाती (अ) साठी ३% , भटक्या जमाती (ब) साठी २.५% , भटक्या जमाती (क) साठी ३.५% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १७% , एसईबीसीसाठी ८% , ईडब्ल्यूएससाठी ८% आणि खुला प्रवर्गासाठी २८% आरक्षण लागू करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी आरक्षण : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १३% , अनुसूचित जमातींसाठी १५% , विमुक्त जाती (अ) साठी ३% , भटक्या जमाती (ब) साठी २.५% , भटक्या जमाती (क) साठी ३.५% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १९% , एसईबीसीसाठी ८% , ईडब्ल्यूएससाठी ८% आणि खुला प्रवर्गासाठी २४% आरक्षण विहित करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यासाठी आरक्षण : गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १२% , अनुसूचित जमातींसाठी २४% , विमुक्त जाती (अ) साठी २% , भटक्या जमाती (ब) साठी २% , भटक्या जमाती (क) साठी २% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १७% , एसईबीसीसाठी ८% , ईडब्ल्यूएससाठी ८% आणि खुला प्रवर्गासाठी २१% आरक्षण लागू करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यासाठी आरक्षण : रायगड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १२% , अनुसूचित जमातींसाठी ९% , विमुक्त जाती (अ) साठी ३% , भटक्या जमाती (ब) साठी २.५% , भटक्या जमाती (क) साठी ३.५% , भटक्या जमाती (ड) साठी २% , विशेष मागास प्रवर्गासाठी २% , इतर मागास वर्गासाठी १९% , एसईबीसीसाठी १०% , ईडब्ल्यूएससाठी ९% आणि खुला प्रवर्गासाठी २८% आरक्षण विहित करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा