मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे सेवा निवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या रिक्त जागेवर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने अजीज शेख, भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक अजीज शेख यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे मांची मंत्रालयातच अप्पर मुख्य सचिव महसूल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.