अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


खारगे यांच्याकडे यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. तत्पूर्वी त्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांत महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. महसूल विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विभागाच्या कामाचा तसेच पुढील कामाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.


समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी कायद्यांमध्ये बदल करायचा झाल्यास तो अवश्य करण्यात येईल. जाणीवपूर्वक झालेला कोणताही गैरप्रकार स्वीकारला जाणार नाही, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे कालबद्ध पद्धतीने निकाली काढून कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सांगून विभागाचे कामकाज यापुढे संपूर्णपणे ई- ऑफिसच्या माध्यमातून चालणार असल्याचे अपर मुख्य सचिव खारगे यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विभागाचे कामकाज गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन !

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. आज दुपारी २ ते ३ या

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा