बेस्टच्या वर्धापनदिनी संग्रहालयात विशेष प्रदर्शन

  51

दुमजली बसचे संग्रहिका म्हणून कायमस्वरूपी जतन


मुंबई  : बेस्टचा ७८ वा वर्धापन दिन येत्या सात ऑगस्ट रोजी असून यंदा ही तो उत्साहात साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या ऐतिहासिक वस्तूंचे व उपक्रमाची प्रगती दर्शवणारे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई शहराला अखंडपणे वीजपुरवठा आणि परिवहन सेवा पुरवणाऱ्या बेस्टचा ७ ऑगस्ट १९४७ रोजी महापालिकेत समावेश करण्यात आला. त्याला यंदा ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिन ‘बेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सध्याच्या पिढीला बेस्ट उपक्रमाचा जाज्वल्य इतिहास समजावा, यासाठी बेस्टतर्फे दरवर्षी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदाही बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगारातील संग्रहालयात हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.

८ ते १० ऑगस्ट या दिवशी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने बेस्ट उपक्रमाचा इतिहास व वेध घेता येणार आहे. यंदाही या प्रदर्शनासोबतच बेस्ट उपक्रमाच्या जुन्या डिझेलवरील दुमजली बसचे संग्रहिका म्हणून कायमस्वरूपी जतन केले जाणार आहे. या संग्रहिकेची बेस्ट दिनी उद्घाटन करण्यात येणार आहे.

 

  • एक दुमजली बस, संग्रहिका म्हणून बेस्टच्या संग्रहालयात कायमस्वरूपी ठेवली जाणार आहे. त्या बसमध्ये ध्वनीचित्रीद्वारे बेस्ट उपक्रमाच्या दुमजली बसचा इतिहास तसेच बेस्ट उपक्रमांने आतापर्यंत वापरलेल्या बस गाड्यांची छायाचित्रे संग्रहित करण्यात आलेली आहेत.

  • त्याचप्रमाणे बेस्ट प्रकरणाच्या २७ बस आगारांच्या प्रतिकृती बनवण्यात आले असून हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असेल.

  • बेस्ट उपक्रमांने गेल्या ९९ वर्षात वापरलेल्या एक मजली बस गाड्यांची छायाचित्रेही यंदाच्या आकर्षण असेल.

Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक