एमएसएमई क्षेत्रांमध्ये सकारात्मक गती कायम !
मुंबई: भारतीय लघु उद्योग विकास बँक (एसआयडीबीआय) ने त्यांच्या "एमएसएमई आउटलुक सर्वेक्षण" ची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे, जी एक तिमाही प्रकाशन आहे. भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधील (एमएसएमई) व्यवसायाच्या भावनेबद्दल ही आवृत्ती महत्त्वाची माहिती देते. हे व्यापक संपूर्ण भारतातील (Pan India) सर्वेक्षण उत्पादन, सेवा आणि व्यापार क्षेत्रात कार्यरत असलेल्या एमएसएमईंचे दृष्टिकोन अंतर्भूत करते. लीड तसेच लॅग इंडिकेटर एमएसएमई व्यवसाय अपेक्षा निर्देशांक (एम- बीईआय) आणि एमएसएमई व्यवसाय परिस्थिती निर्देशांक (एम-बीसीआय) द्वारे महत्त्वपूर्ण डेटा अंतर भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवते. या अहवालातून काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. या सर्वेक्षणात ० ते १०० पर्यंतचे हे निर्देशांक एमएसएमई (MSME) भावना दर्शवतात, ज्याचे ५० पेक्षा जास्त मूल्य आहे ते सकारात्मक दृष्टिकोन दर्शवितात. प्रामुख्याने एम-बीसीआय (M- BCI) आणि एम-बीईआय (M- BEI) हे सहा प्रमुख पॅरामीटर्सवरून घेतले जातात ज्यात विक्री,नफा मार्जिन, कुशल कामगारांची उपलब्धता, खेळत्या भांडवलाची उपलब्धता (Working Capital Requirements) आणि एकूण वित्तपुरवठा आणि एकूण व्यवसाय परिस्थिती यांचा एकात्मिक पद्धतीने विचार केला जातो.
सर्वेक्षणात क्षमता वापर, भांडवली खर्च, व्याजदराचा ट्रेंड आणि व्यवसाय करण्याची सुलभता यांचाही समावेश आहे. सध्याचा आढावा विविध प्रदेश आणि उद्योगांमधील १२०० एमएसएमईंच्या प्रतिनिधी नमुन्यातील (Sample Size) माहितीवर आधारित आहे. या नवीनतम निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कंपोझिट एमएसएमई बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स (एम-बीसीआय) मागील तिमाहीत ६०.८२ वरून ६३.७५ वर पोहोचला आहे. ही वाढ एमएसएमईंसाठी अनुकूल व्यवसाय वातावरण दर्शवते, उत्पादन आणि व्यापार क्षेत्रांमध्ये तीव्र सुधारणा होत आहेत, तर सेवा क्षेत्र ६० च्या वर मजबूत आत्मविश्वास पातळी राखत आहे, जे सतत आशावाद दर्शवते असे अहवालात नमूद केले गेले आहे.
माहितीत म्हटले आहे की, 'येणाऱ्या तिमाहींसाठीचा दृष्टीकोन आशादायक आहे. पुढील तिमाहीसाठी कंपोझिट एमएसएमई बिझनेस एक्सपेक्टेशन्स इंडेक्स (एम-बीईआय) ६२.१९ वर आहे आणि पुढील वर्षीच्या त्याच तिमाहीत ६७.८८ वर पोहोचेल. व्यापार आणि सेवा क्षेत्रात भावना विशेषतः मजबूत दिसतात, जिथे आर्थिक वर्ष २७ मधील पहिल्या तिमाहीत (Q1FY2027) साठी M-BEI अनुक्रमे ६८.३२ आणि ६८.२४ नोंदवले गेले आहे. आर्थिक वर्ष २०२६ मधील दुसरी तिमाहीत (Q2FY2026) साठी अपेक्षा निर्देशांकांमध्ये मध्यम घट दिसून आली असली तरी, हे कदाचित जवळच्या काळातील जागतिक अनिश्चिततेचे प्रतिबिंबित करते, दीर्घकालीन आशावाद कायम आहे.'
विक्री कामगिरीच्या बाबतीत, उत्पादन आणि व्यापार क्षेत्रातील अर्ध्याहून अधिक एमएसएमईने (MSMEs) Q1FY26 मध्ये वाढ नोंदवली आहे. सेवा क्षेत्रात, ४२% एमएसएमईने (MSMEs)ने विक्री वाढ नोंदवली असून आणखी ४८% ने स्थिर विक्री नोंदवली आहे. वर्षानुवर्षे, तिन्ही क्षेत्रातील MSMEs ने सातत्यपूर्ण विक्री वाढ दर्शविली, सुमारे ६०% पुढील वर्षात आणखी विस्ताराची अपेक्षा करत आहेत.'अहवालानुसार याशिवाय एमएसएमईतील नफ्यातही लवचिकता (Flexibility) दिसून आली. इनपुट खर्चात वाढ झाल्याची नोंद असूनही, सर्व क्षेत्रातील एमएसएमईने MSMEs ने निव्वळ नफ्याचे मार्जिन सुधारले आहे. भविष्याकडे पाहता, सेवा आणि व्यापार क्षेत्रातील प्रतिसादकर्त्यांना उत्पादन क्षेत्राच्या तुलनेत खर्चात तुलनेने जास्त वाढ अपेक्षित आहे, तरीही ते येत्या वर्षात त्यांची नफा टिकवून ठेवण्याचा विश्वास ठेवतात असे अहवालाने स्पष्ट केले.
रिपोर्टमधून या फेरीत कुशल कामगारांच्या उपलब्धतेत (Skill Worker Availability) लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. सर्व क्षेत्रातील जवळजवळ एक चतुर्थांश एमएसएमईंनी कुशल कामगारांची उपलब्धता चांगली असल्याचे नोंदवले आहे. हा सकारात्मक ट्रेंड सुरू राहण्याची अपेक्षा आहे, येत्या वर्षात कुशल कामगार उपलब्धतेत आणखी सुधारणा होण्याची आशा असलेल्या व्यवसायांनी व्यक्त केली गेली. वित्तपुरवठ्याची उपलब्धता सुधारली आहे, सहभागी एमएसएमईंपैकी ८८% लोकांनी एकूण वित्तपुरवठ्याची उपलब्धता पुष्टी (Confirm) केली आहे. मागील सर्वेक्षणात ७९% वरून ८८% ही वाढ झाली आहे. व्यापार क्षेत्रात हा ट्रेंड विशेषतः प्रमुख आहे. वाढत्या विक्री, क्षमता वापर आणि इनपुट खर्चासह, आता क्षेत्राच्या वित्तपुरवठ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी औपचा रिक कर्जाचा विस्तार करण्याची अधिक शक्यता आहे.
सर्वेक्षणात व्याजदरात हळूहळू सुधारणा होत असल्याचे सूचित केले आहे, ज्यामध्ये मागील फेरीच्या तुलनेत वित्तपुरवठ्याच्या खर्चात वाढ कमी होत असल्याचे उत्तरदात्यांचे म्हणणे आहे. तरीही, एमएसएमईंना वित्तपुरवठ्याच्या उच्च खर्चाबद्दल चिंता आहे.फेब्रुवारी २०२५ पासून आरबीआयच्या बेंचमार्क रेपो दरात अलिकडेच १०० बेसिस पॉइंटची कपात सकारात्मक ट्रेंड दर्शवते, व्याजदर हस्तांतरण सुरू आहे आणि यामुळे एमएसएमईंच्या चिंता दूर होण्याची अपेक्षा आहे असेही निरिक्षण अहवालाने नोंदवले आहे. सध्याच्या सर्वेक्षणात व्यवसाय सुलभतेत (Ease of Doing Business EoDB) सुधारणा देखील अधोरेखित झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत क्षेत्रातील सुमारे ५०% प्रतिसादकर्त्यांनी (Respondent) चांगला ईओडीबी अनुभव नोंदवला. भविष्यासाठी अ पेक्षा तितक्याच सकारात्मक आहेत, ६०% पेक्षा जास्त लोकांना पुढील एका वर्षात आणखी सुधारणा अपेक्षित आहेत. विशेषतः, सुमारे ५०% प्रतिसादकर्त्यांनी रिटर्न फाइलिंग आणि नियतकालिक अनुपालनात सुधारणा नोंदवल्या.