PNB Q1 Results: PNB Bank तिमाही निकाल जाहीर! बँकेच्या निव्वळ नफ्यात ४८% घसरण तरीही निकाल मजबूत! 'या' कारणांमुळे

  59

मोहित सोमण: पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank PNB) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या निकालानुसार, बँकेच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४८% घसरण झाली आहे जी प्रामुख्याने ही घसरण बँकेच्या वाढत्या खर्चामुळे झाली असली तरी बँकेच्या असेट क्वालिटीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेने ५०८३ कोटींचा वन टाईम टॅक्स भरल्याने ही नफ्यात घसरण झाली असे बँकेकडून सांगण्यात आले. एप्रिल ते जून महिन्यात बँकेच्या असेट क्वालिटीत सुधारणा झाली ज्यामध्ये बँकेच्या स्थूल एनपीए (Gross Non Performing Assets) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३.९५% वरून ३.७८% घसरण झाली.

विशेषतः बँकेच्या स्थूल एनपीएत (Gross NPA) मागील वर्षाच्या ४२६६३ कोटींच्या थकीत देंण्याच्या तुलनेत या तिमाहीत ८५९० कोटींवर घसरण झाल्याने बँकेच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा झाली आहे. बँकेच्या निव्वळ एनपीएत (Net NPA) मागील वर्षाच्या ५९३० कोटींच्या तुलनेत घसरण होत ४१३२ कोटींवर एनपीए घसरला आहे.बँकेच्या बुडीत कर्जांसाठीच्या तरतुदींमध्ये अनुक्रमे ३३% आणि वार्षिक ५०% घट होऊन ३९६ कोटी झाले आहे.जून २०२५ पर्यंत बँकेचा जागतिक व्यवसाय वार्षिक आधारावर इयर ऑन इयर बेसिसवर ११.६% वाढून २७.१९ लाख कोटी झाला आहे ज्यामध्ये जागतिक ठेवी १२.९% ने वाढून १५.८९ लाख कोटी झाल्या आणि जागतिक कर्ज ९.८% ने वाढून ११.३० लाख कोटी झाले. कर्ज वाटपाचा विचार केल्यास आर्थिकदृष्ट्या किरकोळ कर्जांमध्ये (Retail Loans) इयर ऑन इयर बेसिसवर ११.८% ची चांगली झाली असून मुख्य किरकोळ कर्ज १७.७% ने वाढले. याशिवाय, एमएसएमई कर्जे वाटप १८.६% वाढून १.६९ लाख कोटी झाले असल्याचे बँकेने म्हटले आहे. बचत ठेवी २.८% ने वाढून ४.९८ लाख कोटी झाल्या, तर चालू ठेवी ९.२% वाढून ७०,६५६ कोटी झाल्या. जून २०२५ पर्यंत कासा (CASA) ठेवी ३.६% वाढून ५.६९ लाख कोटी झाल्या, ज्यामध्ये कासा प्रमाण ३६.९९% होते, असे पीएनबीने छापलेल्या निकालात स्पष्ट केले आहे.

बँकेच्या कमाईत वाढ !

बँकेच्या कमाईत (Income) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीत ३२१६६ कोटींच्या तुलनेत वाढ होत या तिमाहीत ३७२३२ कोटींपर्यंत वाढ झाली.

व्याज उत्पन्नात वाढ !

बँकेच्या एकूण व्याज उत्पन्नात (Total Income) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षाच्या २८५५६ कोटींवरून वाढत या तिमाहीत ३१९६४ कोटींवर पोहोचले आहे.

फी आधारित उत्पन्नात वाढ !

फी आधारित उत्पन्नातही बँकेने वाढ नोंदवली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षाच्या तिमाहीतील २०७७ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २२५० कोटींवर उत्पन्न पोहोचले आहे.

निकालातील इतर महत्वाचे मुद्दे -

कार्यक्षमता/उत्पादकता गुणोत्तर ( Efficiency Productivity Ratio) -

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत निव्वळ व्याज मार्जिन २.८४% आहे.

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत जागतिक स्तरावरील अग्रिम उत्पन्न (Advance Yield) ८.१४% आहे.

जून २०२५ रोजी प्रति कर्मचारी व्यवसाय वाढून २७.३० कोटी झाला आहे जो जून २०२४ च्या २४.८० कोटी होता.

जून २०२४ च्या २३३.२६ कोटी होता तो जून २०२५ रोजी प्रति शाखेचा व्यवसाय वाढून २५७.३९ कोटी झाला आहे.

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत प्रति कर्मचारी निव्वळ नफा ६.९८ लाख आहे.

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत प्रति शाखेचा निव्वळ नफा ६५.८० लाख आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये १.१७% घसरण झाली असली तरी बँकेच्या फंडामेंटल मजबूत झाल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे.
Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची