महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाला “छत्रपती महामार्ग” नामकरण करणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आज संभाजीराजे छत्रपती यांनी सदिच्छा भेट घेतली. रायगडाच्या दिशेने जाणाऱ्या महाड़-रायगड राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या रस्त्याचा ऐतिहासिक आणि भावनिक वारसा लक्षात घेता, त्याला “छत्रपती महामार्ग” असे नाव देण्याची मागणी मांडली असता तात्काळ प्रतिसाद देत “छत्रपती महामार्ग” असे नामकरण करण्यात येणार अशी घोषणा केली.


पूर्वी छोटा व वळणावळणाचा असलेला हा रस्ता आज गडकरी यांच्या विशेष पुढाकाराने 206 कोटींच्या निधीमधून विकसित होत आहे. जवळपास ९०% काम पूर्ण झाले असून, शिवराज्याभिषेकाच्या काळात होणारी लाखोंची ऐतिहासिक गर्दी आणि नियमित वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोठी सुविधा ठरते आहे.


या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास, पथदिवे, विश्रांतीस्थळे, ऐतिहासिक शिल्प व सांस्कृतिक दर्शन घडवणारे घटक असावेत, अशी संकल्पना मांडली असता, गडकरी यांनी ती तत्काळ मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वाढीव निधीची तरतूद कशी करता येईल यावरही मार्गदर्शन केले.


संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्ष या नात्याने आणि लाखो शिवभक्तांच्या वतीने गडकरीचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना