तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात १ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सध्या देवीच्या सिंहासनाजवळ जीर्णोद्धाराची कामे सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या काळात भाविकांना देवीचे केवळ मुखदर्शनच घेता येणार आहे. मात्र, देवीची सिंहासन पूजा, अभिषेक व इतर धार्मिक विधी मात्र नियमितपणे सुरू राहतील, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष व चिन्हाच्या मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने २० ऑगस्ट रोजी निकाल देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण पुन्हा एकदा यावर ...
दरम्यान, मंदिर संवर्धनाच्या कामावर संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वीच तीव्र आक्षेप नोंदवला होता. ब्लास्टिंगसारख्या पद्धती वापरून केलेले काम मंदिराच्या ऐतिहासिक रचनेला धोका निर्माण करू शकते, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आता नव्याने पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
दर्शन बंदीमुळे काही काळासाठी भाविकांची गैरसोय होणार असली तरी, तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी आणि ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं मंदिर संस्थानने म्हटले आहे.