मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १००४८ रूपये,२२ कॅरेटसाठी ९२१० रूपये, १८ कॅरेटसाठी ७५९५ रूपये आहेत. जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ०.१०% वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.१३% वाढ झाल्याने दर पातळी प्रति डॉलर ३३३० औंसवर गेली होती. भारतीय कमोडिटी बाजार एमसीएक्समध्येही सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४२% वाढ झाल्याने दरपातळी ९९५३२.०० रूपयांवर गेली आहे.
आज युएस बाजारातील अस्थिरतेचा फटका व दबाव सोन्यात कायम होता. कालच्या घसरणीनंतर आज होत असलेल्या फेड निकालांच्या पार्श्वभूमीवर अस्थिरतेला पर्याय म्हणून सोने गुंतवणूक वाढवल्याने, याशिवाय मागणीत वाढ झाल्याने, डॉलर निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे आज सोने महागले होते. मात्र संध्याकाळी सोने स्थिरावले असले तरी सततच्या डॉलर तुलनेत रूपयातील होत असलेल्या घसरणीमुळे सोन्याला आधारभूत किंमत मिळू शकली नाही. भारतीय बाजारपेठेत वाढती मागणी, याशिवाय घटलेल्या पुरवठ्यात घसलेला रूपया अशा एकत्रित कारणांनी सोन्यात वाढ झाली.
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की, 'कॉमेक्स सोन्याच्या एका रात्रीत झालेल्या वाढीमुळे आणि रुपयातील तीक्ष्ण कमकुवतपणामुळे देशांतर्गत किमती वाढल्या. सोन्याचा भाव ४०० रुपयांनी वाढून ९९५०० रुपयांवर पोहोचला. कॉमेक्स सोन्याच्या मर्यादित पाठिंब्यामुळे ९८००० वरून ९९५०० रूपये पर्यंतची अलीकडील तेजी मुख्यत्वे रुपयावर अवलंबून आहे. बाजारातील सहभागी आता आज रात्री उशिरा यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयाच्या संकेतांची वाट पाहत आहेत, तसेच जीडीपी, एडीपी नॉन-फार्म एम्प्लॉयमेंट चेंज, बेरोजगारी दर आणि नॉन-फार्म पेरोल्स यासारख्या प्रमुख आर्थिक डेटाचीही वाट पाहत आहेत. घडामोडी पाहता, सोन्याची श्रेणी ९८५००-१०१००० पातळीपर्यंत वाढली आहे.
चांदीच्या दरातही आज अखेर वाढ -
प्रदीर्घ विश्रांतीनंतर चांदीतही आज वाढ झाली. तीन दिवस चांदीच्या दरात कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळे चांदीचे 'जेसै थे' दर वाढीत बदलले आहेत. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपये वाढ होत चांदी ११७ रुपयांवर गेली. १ किलो चांदीत १००० रुपयांनी वाढ झाल्याने प्रति किलो दर ११७००० रूपयांवर गेले आहेत. आज चांदीच्या दरात झालेले बदल हे प्रामुख्याने मागणी पुरवठा यांच्यातील बदलत्या गुणोत्तरामुळे झाले आहे. चांदीच्या ईपीएफमध्येही गुंतवणूकदारांनी आपली गुंत वणूक काही काळापासून वाढवली आहे. अस्थिरतेच्या काळात तरलता (Liquidity) टिकवण्यासाठी गुंतवणूकदारांनी चांदीच्या खरेदीत वाढ केल्याने ही दरवाढ झाली. याशिवाय औद्योगिक उत्पादनातील वाढत्या मागणीमुळे दरपातळीत वाढ झाली.
अस्थिरतेच्या तोंडावर सोन्याच्या जागतिक सिल्वर फ्युचर निर्देशांकात मात्र ०.८४% घसरण झाली आहे. भारतीय बाजारपेठेतील कमोडिटी एक्सचेंज असलेल्या एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकातही ०.१९% घसरण संध्याकाळपर्यंत झाली होती.