बेन स्टोक्स दुखापतीमुळे पाचव्या कसोटीला मुकणार

लंडन : इंग्लंडचा संघ ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सशिवाय खेळणार आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. स्टोक्सऐवजी ऑली पोपकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोपने भारताविरुद्ध लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावले होते. मँचेस्टर कसोटीत त्याने इंग्लंडसाठी ७१ धावांची खेळी केली होती. मँचेस्टरमधील अनिर्णित सामन्यानंतर


इंग्लंडने आपल्या संघात एकूण चार बदल केले आहेत.ज्यात जेकब बेथेल, गस अ‍ॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टोंग यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्से यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर लियाम डॉसनला पूर्णपणे वगळण्यात आले आहे. बेथेल आणि जो रूट हे दोन फिरकी गोलंदाजीचे पर्याय इंग्लंडकडे आहेत.तर क्रिस वोक्सला अननुभवी वेगवान गोलंदाजींच्या आक्रमणाचे नेतृत्व करण्यासाठी कायम ठेवण्यात आले आहे.


बेन स्टोक्सची अनुपस्थिती इंग्लंडसाठी एक मोठा धक्का आहे. स्टोक्स मालिकेत सर्वाधिक १७ बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने मँचेस्टरमध्ये दोन वर्षांत पहिले कसोटी शतक झळकावले आणि गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. गेल्या वर्षी दोन वेळा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे स्टोक्ससाठी हा आणखी एक निराशाजनक धक्का आहे आणि अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडच्या समोर हा चिंतेचा विषय आहे.

Comments
Add Comment

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे