"डोक्यावर केस नाही म्हणून चीनला देणार का?" – अमित शाहांचा नेहरुंसह काँग्रेसवर'हल्लाबोल'

काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांमुळेच आज दहशतवादाची समस्या उग्र झाली


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल केला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “काँग्रेसने इतिहासात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळेच आज देशाला दहशतवादासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.”


शाह यांनी १९६२च्या भारत-चीन युद्धाचा संदर्भ देत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, नेहरूंनी अक्साई चीनचा ३८,००० चौरस किलोमीटर भूभाग चीनला दिला होता. नेहरू म्हणाले होते की, त्या भागात गवताची काडीही उगवत नाही, तर त्याचं काय करणार? त्यावर खासदार महावीर प्रसाद त्यागी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं, ‘तुमच्या डोक्यावरही केस नाहीत, मग तेही चीनला द्यायचे का?’


इतिहासातील इतर अनेक घटनांवर भाष्य करत शाह म्हणाले की, १९४८ मध्ये भारतीय लष्कर काश्मीरमध्ये आघाडीवर असतानाही नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम घोषित केला होता. “सरदार पटेल युद्ध थांबवू नका म्हणत होते, पण नेहरूंचा निर्णय वेगळा होता.”



१९६० मधील सिंधू पाणी वाटप करारावर भाष्य करताना शाह म्हणाले, “भारतीय हिताच्या विरुद्ध जाऊन ८० % पाणी पाकिस्तानला देण्यात आले. आपण भौगोलिक आणि रणनीतिकदृष्ट्या मजबूत स्थितीत असतानाही असा निर्णय झाला.”


१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात जिंकलेला महत्त्वाचा भूभाग १९६६ च्या करारात पाकिस्तानला परत देण्यात आल्याची आठवणही त्यांनी करून दिली.


१९७१ च्या युद्धावर बोलताना शाह म्हणाले, “इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून ऐतिहासिक विजय मिळवला. ९३ हजार पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी होते, आणि १५ हजार चौरस किलोमीटर भूभाग भारताच्या ताब्यात होता. पण शिमला करारात सगळं पाकिस्तानला परत देण्यात आलं आणि पीओकेचा मुद्दा कायमचा गुंतागुंतीचा झाला.”


अमित शाह यांच्या या भाषणामुळे संसदेत काँग्रेसविरोधी वातावरण अधिक तापलं. ऐतिहासिक चुका उघड करत त्यांनी आजच्या सुरक्षाव्यवस्थेच्या प्रश्नांचे मूळ काँग्रेसच्या धोरणांमध्ये असल्याचं ठासून सांगितलं.

Comments
Add Comment

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने