‘प्लास्टिकमुक्त चिपळूण’ची महिलांच्या पुढाकाराने यशस्वी लढाई

१२ दिवसांत ४३७ किलो प्लास्टिक संकलन


चिपळूण : चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी घेतलेला पुढाकार आता शहरातील महिलांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक प्रभावी ठरत आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होम मिनिस्टर’ ही महिलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


१५ जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आजपर्यंत १७८ महिलांनी सहभाग नोंदवला असून केवळ १२ दिवसांत तब्बल ४३७ किलो प्लास्टिक संकलित करण्यात आले आहे. हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महिलांच्या या सहभागीवृत्तीमुळे शहरात स्वच्छतेची लाट उसळली असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक ठोस पाऊल पडले आहे.
या स्पर्धेतील संकल्पना अतिशय अभिनव आहे. महिनाभरात किमान १५ दिवस प्लास्टिक संकलन करणाऱ्या महिलांना विशेष कूपन्स देण्यात येत असून, त्यातून लकी ड्रॉद्वारे एक भाग्यवान महिला ‘सोन्याची नथ’ जिंकेल.


याशिवाय, १५ ऑगस्टनंतर सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेतून दुसऱ्या एका विजेत्या महिलेला ‘पैठणी’ प्रदान केली जाणार आहे. अशा प्रकारे स्वच्छतेच्या कार्यात महिला सहभागी होत असतानाच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्नही या उपक्रमातून होत आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण उपक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोरपणे केले आहे.


महिलांनी घरातील प्लास्टिक गोळा केल्यानंतर फक्त एक संदेश दिला की संस्था कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन प्लास्टिक उचलतात, इतका सुटसुटीत आणि प्रभावी हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे महिलांना केवळ बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत नाही, तर त्यांना समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचे समाधानही लाभते आहे. त्यांच्या


पुढाकारामुळे चिपळूण शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती होत आहे. पर्यावरणविषयक भान निर्माण होत आहे आणि समाजात सकारात्मक ऊर्जा रुजत आहे.
या उपक्रमात सहभागी होण्याची संधी अजूनही महिलांसाठी खुली असल्याचे आवाहन चिपळूण नगर परिषद आणि आयोजक संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

“कोकण हा शिवसेनेचा श्वास, शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास” - एकनाथ शिंदे

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकणारच, ही काळ्या दगडावरची

रत्नागिरी जिल्ह्यात मर्सिडीज बेंझ जळून खाक

रत्नागिरी : खेड तालुक्यातील नातूनगर येथे मर्सिडीज बेंझ कारला आग लागली. सोमवारी मध्यरात्री २.५० च्या सुमारास ही

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा हुकला

मनसेचं 'वैभव' भाजपला केव्हा फळणार? मुंबई : नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी मराठीत म्हण आहे. वैभव खेडेकर यांच्या