Rohini Khadse: रेव्ह पार्टी करणाऱ्या पतीसाठी रोहिणी खडसे अ‍ॅक्शन मोडवर, अंगावर चढवला वकिली कोट

पुणे:  पुण्यातील खराडी येथील रेव्हा पार्टी प्रकरणी एकनाथ खंडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यासह इतर सात आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. ही कोठडी आज संपली आहे. त्यामुळे आज या सर्व आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यादरम्यान न्यायालयात रोहिणी खडसे यादेखील दिसल्या. आपल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी अंगावर वकिलीचा कोट चढवलेला दिसून आला. सुनावणीदरम्यान, पुणे न्यायालयात त्या वकिलाचा कोट घालून हजर होत्या.

पतीसाठी वकील म्हणून रोहिणी खडसे न्यायालयात हजर


प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या बाजूने रोहिणी खडसे आज न्यायालयात हजर होत्या. रोहिणी खडसे यांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्या खुद्द एक वकील आहेत. त्यामुळे आपल्या पतीच्या सुटकेसाठी त्यादेखील प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोहिणी खडसे आज न्यायालयात वकिलीचा कोट घालून हजर राहिल्या.  न्यायालयात येण्याआधी रोहिणी खडसे यांनी खेवलकर यांच्यावर कोणकोणते गुन्हे दाखल करण्यात आले, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली. त्यानंतर रोहिणी खडसे थेट न्यायालयात वकीली पोषाखात उपस्थित राहिल्या. दरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या जावयाला अडकवण्यात येत आहे, असा दावा खडसेंनी केला आहे.
Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व