प्रतिनिधी: सलग तीन दिवस वाढल्यानंतर काल सोन्याने विश्रांती घेतल्याने विश्रांती घेतली होती. आज मात्र गुंतवणूकदारांना सोन्याने आणखी दिलासा दिला आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११ रूपये, २२ कॅरेट च्या प्रति ग्रॅम दरात १० रूपये, व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सोन्याचे दर आज २४ कॅरेटसाठी ९९८२ रूपये, २२ कॅरेटसाठी ९१५० रूपये,१८ कॅरेटसाठी ७४८७ रुपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्या च्या प्रति तोळा किंमतीत ११० रूपयांनी घसरण झाल्याने प्रति तोळा किंमत ९९८२० रूपये, २२ कॅरेट प्रति तोळा किंमतीत १०० रूपयांनी घसरण झाल्याने दर ९१५०० रूपयांवर, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८० रूपयांनी घसरण झाल्याने दर ७४८७० रूपयावर गेले आहेत.
संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतीय सराफा बाजारातील मुंबईसह प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ९९८२ रूपये,२२ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम दर ९१५० रूपयांवर गेला आहे. सोन्याच्या जागतिक निर्देशांकातील गोल्ड फ्युचर निर्देशां कात (Gold Futures Index) मध्ये आज सकाळी घसरण झाली होती. आज संध्याकाळी मात्र निर्देशांकात ०.१२% वाढ झाली आहे.प्रामुख्याने ही वाढ डॉलर निर्देशांकातील वाढीमुळे झाली असली तरी भारतीय बाजारपेठेत घसरलेल्या रूपयांच्या मूल्याने सोने आ ज अधिक पातळीने घसरू शकले नाही. सकाळपर्यंत सोन्याच्या मागणीत व कमी झालेली घसरण ही स्पॉट बोलीमुळे झाली होती असे तज्ञांनी म्हटले होते.
संध्याकाळपर्यंत सोन्याच्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.०५% किरकोळ वाढ झाल्याने दरपातळी आता प्रति डॉलर ३३१५.८८ औंसवर गेली आहे.भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये ०.२१% वाढ झाल्याने संध्याकाळपर्यंत सोन्याची दरपातळी ९७७५४ रूपयांवर गेली आहे.
सोन्याच्या संभाव्य परिस्थितीवर काय म्हटले आहे तज्ञांनी काय म्हटले?
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' सोन्याचे भाव ३५० रुपयांच्या वाढीसह ९७९०० पातळीवर किंचित वाढले, तर कॉमेक्स सोन्याचे भाव ०.३०% वाढून ३३२५ डॉलरवर पोहोचले. या आठवड्यात फेडच्या दर निर्णयासोबतच प्रमुख अमेरिकन आर्थिक डेटा - एडीपी नॉन-फार्म एम्प्लॉयमेंट चेंज, नॉन-फार्म पेरोल्स, बेरोजगारी दर आणि जीडीपी - रांगेत असल्याने, किंमत कारवाई अस्थिर राहण्याची अपेक्षा आ हे. नजीकच्या काळात सोने ९७०००- ९८६५० पातळीच्या मर्यादेत जाण्याची शक्यता आहे'