माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा भाजपामध्ये प्रवेश

  69

परभणी : परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वरपुडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर, आ. तानाजी मुटकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे, अमर राजुरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, परभणी महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.


यावेळी चव्हाण म्हणाले की, सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून विकसित भारत आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवून, प्रत्येक क्षेत्रात राज्याला अव्वल बनवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या वरपुडकर यांच्या पक्षप्रवेशाने परभणी जिल्ह्यात भाजपा संघटना अधिक मजबूत होईल. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपामध्ये सन्मान राखला जाईल अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली .


यावेळी महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की सहकार क्षेत्रातील कार्य आणि समाजकार्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात चार दशकांपासून ठसा उमटवणारे  वरपुडकर यांच्या भाजपा प्रवेशाने पक्ष संघटनेला बळ मिळेल.


भाजपाच्या विकासनीतीला साथ देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे वरपुडकर म्हणाले. सर्वांच्या साथीने भाजपाची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीस हातभार लावण्याचा संकल्प वरपुडकर यांनी केला.


भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, जिल्हा परिषद माजी सभापती परभणी धोंडीराम चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम वाघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रेरणा वरपुडकर, माजी समाजकल्याण सभापती द्वारकाबाई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य तुळशीराम सामाले, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर कटिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर लाड, दिलीपराव साबळे आदींचा समावेश आहे.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल