'आई तुळजाभवानी' मालिकेत दैवी लीला! मोहिनीच्या 'मायावी' अंताचा थरार

मुंबई : कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका 'आई तुळजाभवानी' आता एका अत्यंत थरारक आणि भावनिक टप्प्यावर पोहोचली आहे. 'आई कोण?' या मूलभूत प्रश्नाभोवती फिरणाऱ्या कथानकात, षड्रिपू मोहसारख्या स्त्रीरूपाचे अभेद्य मायाजाल आणि यावर देवी तुळजाभवानीचा न भूतो न भविष्यती असा दैवी हस्तक्षेप प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा विशेष भाग नेत्रदीपक ग्राफिक्सची पर्वणी ठरणार आहे.


या विशेष भागात, जगदंबा मिळणार या आनंदात मोह गावात उभी असते. ती कुटिल हसत म्हणते, "तुला आता माझ्यापासून कुणीच वाचवू शकणार नाही… कारण सौंदर्याच्या जाळ्यात कुणालाही अडकवून, मी हवं तसं खेळवू शकते आणि मला जे हवे ते मिळवू शकते." मात्र, त्याच क्षणी छोटी जगदंबा तिच्यासमोर उभी ठाकते. पाहता पाहता पाच-सहा 'जगदंबा' तिच्या आजूबाजूला वर्तुळाकार उभ्या राहतात. "हे काय चाललंय? सगळीकडे जगदंबाच?" असे म्हणत मोह घाबरते. मग एक एक जगदंबा कवड्यांमध्ये रूपांतरित होते, आणि त्या अनेक कवड्यांमधून तेजस्वी तुळजाभवानी देवी प्रकट होते.


हे रूप पाहून मोह अजूनच अस्थिर होते. पण त्या तेजस्वी कवड्या तिच्यावर झेप घेतात. मोह धडपडते. तिचं रूप विद्रूप होतं... चेहऱ्यावर जखमा आणि खड्डे पडतात. त्या कवडीपैकी एक आरशात बदलते. मोह तिथे स्वतःचं विद्रूप रूप पाहते आणि जीवाच्या भीतीने किंचाळते.


तुळजाभवानी मोहरूपी मोहिनीला बजावते, "फक्त रूप असून चालत नाही… तेज हवं जे आतून येतं… आणि अंधार नष्ट करतं!" आता आई तुळजाभवानी मोहरूपी मोहिनीचा विनाश कशी करणार? तिच्या पापांचा हिशोब कसा चुकता करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.


तेव्हा नक्की बघा कशी 'आई तुळजाभवानी'ची दैवी लीला घडणार, आणि कसा मोहिनीचा 'मायावी' अंत होणार. 'आई तुळजाभवानी' मालिकेत दररोज रात्री ९ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

Comments
Add Comment

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर