चिन्मयी सुमितचे प्रतिपादन: मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणे का आहे महत्त्वाचे!

मुंबई: सध्याच्या बदलत्या शिक्षण प्रणालीत मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी अधोरेखित केले. "संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की, पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचे आहे," असे त्या म्हणाल्या. पालकांनी बोर्ड आणि भाषेच्या बदलावर लक्ष केंद्रित न करता, मातृभाषेचे महत्त्व समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


मराठी भाषेचे भविष्य आणि इंग्रजी शिक्षणावरील विचार
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे बोलताना चिन्मयी सुमित यांनी मराठी भाषेच्या भवितव्यावरही आपले विचार मांडले. उच्चभ्रू समाजाकडून मराठी भाषेला टिकवून ठेवण्याची आशा कमी असली तरी, मध्यमवर्गीय लोक मराठी भाषा जपतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, इंग्रजी बोलता येण्यासाठी इंग्रजी माध्यमातच शिक्षण घेणे गरजेचे नाही, तर मराठी माध्यमात शिकूनही उत्तम इंग्रजी बोलता येते, असेही त्यांनी नमूद केले.


मान्यवरांचे सत्कार आणि मंडळाची प्रशंसा
या कार्यक्रमात चिन्मयी सुमित यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार आपला नसून, संस्थेच्या कामाचा गौरव आहे, असे नम्रपणे त्यांनी सांगितले. सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची प्रशंसा केली. "या संस्थेने मला घडवले आहे आणि मंडळ हे एक विद्यापीठच आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. संस्थेचे काम वाढत असून, एक 'उत्कर्ष भवन' उभारले जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इंडोको रेमिडीजच्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे पाणंदीकर यांनी आजच्या काळात शिक्षणापेक्षा सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.


प्रकाशन सोहळा आणि गुणवंतांचा सन्मान
कार्यक्रमादरम्यान, विविध प्रकाशन सोहळे पार पडले. कार्यक्रम अध्यक्ष अदिती कारे पाणंदीकर यांच्या हस्ते 'शारदास्मृती' या जाहिरात अंकाचे प्रकाशन झाले. चिन्मयी सुमित यांनी 'प्रणामहस्तलिखिता'चे प्रकाशन केले, तर अच्युत पालव यांच्या हस्ते 'विवेकानंद स्मृती' या जाहिरात अंकाच्या दरपत्रकांचे उद्घाटन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शालांत परीक्षेत मंडळातून सर्वप्रथम आलेल्या हितेश जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळप्रमुख विकास शिंदे यांनी केले, तर उपमंडळ प्रमुख नरेश विचारे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सहमंडळ प्रमुख सुधीर फके यांनी आभार प्रदर्शन केले, तर शिक्षणप्रमुख संकेत शिर्के आणि वेद गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Comments
Add Comment

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट