सेबीकडून मोठी अपडेट: 'या' नव्या नियमातील अंमलबजावणीला १ ऑगस्टवरून १ ऑक्टोबरवर सेबीकडून मुदतवाढ

प्रतिनिधी: सेबीकडून रिटेल अल्गोरिथम ट्रेडिंग संदर्भातील कठोर नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. सेबीने याविषयी परिपत्रक काढून बाजाराला आज माहिती दिली आहे. वाढत्या शेअर बाजारातील व्यापाराबरोबर तो सुखकर, पारदर्शक, घोटाळेमुक्त व्यवहार व्हावे यासाठी सेबीने आपल्या ४ फेब्रुवारीचा जीआरमध्ये मुदतवाढ देण्याचे ठरव ले आहे. त्यामुळे आता १ ऑगस्ट न राहता ही मुदतवाढ १ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे. सेबीने ही संबंधित माहिती आपल्या नव्या सूचनापत्रकात दिली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना व ब्रो करला आपल्या कामकाजात परिवर्तन करण्यास आणखी काही वेळ मिळू शकतो. याबद्दलची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी सेबीने शेअर बाजारांना व त्यांच्याशी निगडित सदस्यांना ही माहिती गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आदेश दिले आहेत.

अल्गोरिथम ट्रेडिंग म्हणजे काय?

अल्गोरिथम ट्रेडिंग मध्ये ब्रोकर व गुंतवणूकदार आपल्या दैनंदिन व्यवहारात संगणकाच्या वापरातून विविध कमांड देत व्यवहार करतात. संगणकाला विविध की व टूल्सचा आणि सॉफ्टवेअरचा वापर करत तंत्रज्ञानपूरक शेअर बाजारात ट्रेडिंग करतात. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या ओघात अनेकदा यात प्रकारच्या व्यवहारात गैरव्यवहार अथवा चूक होण्याची शक्यता असते ते टाळण्यासाठी सेबीने काही नियमावली तयार केली आहे. मार्गदर्शक तत्वांच्या आधारे आता पुढील कार्यवाही गुंतवणूकदारांना करणे अपेक्षित आहे.
Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक