अभिनेता अक्षय कुमारने बोरिवलीतील दोन अपार्टमेंट विकून कमावले ७.१० कोटी; ९१% हून अधिक नफा!

मुंबई : अभिनेते अक्षय कुमार पुन्हा एकदा त्यांच्या व्यावसायिक कौशल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी मुंबईतील बोरिवली येथील आपली दोन आलिशान निवासी अपार्टमेंट्स ७.१० कोटी रुपयांना विकली आहेत. या व्यवहारामुळे त्यांना ९१ टक्क्यांहून अधिक निव्वळ नफा झाल्याची माहिती समोर आली आहे.


अपार्टमेंट विक्रीचा तपशील


अक्षय कुमार यांनी विकलेल्या दोन अपार्टमेंटपैकी एक त्यांनी ५.७५ कोटी रुपयांना विकले. विशेष म्हणजे, हे अपार्टमेंट त्यांनी २०१७ मध्ये फक्त ३.०२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. ११०१ चौरस फुटांचे हे अपार्टमेंट दोन कार पार्किंगच्या सुविधेसह होते. या विक्रीत ३४.५० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क समाविष्ट होते.


दुसरे अपार्टमेंट त्यांनी १.३५ कोटी रुपयांना विकले. हे अपार्टमेंटही त्यांनी २०१७ मध्ये ६७.९० लाख रुपयांना खरेदी केले होते. या मालमत्तेचा कार्पेट एरिया २५२ चौरस फूट होता. 'स्केअर यार्ड्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही दोन्ही अपार्टमेंट्स एकमेकांच्या जवळ होती.
या दोन्ही व्यवहारातून अक्षय कुमार यांनी अवघ्या ८ वर्षांत ९१.९५ टक्के नफा कमावला आहे, हे विशेष.


इतर मालमत्तांचे व्यवहार


अभिनेता अक्षय कुमार यांनी यापूर्वीही अनेक मोठ्या मालमत्तांचे व्यवहार केले आहेत. मार्चमध्ये त्यांनी बोरिवलीतील याच टाऊनशिपमधील दोन निवासी मालमत्ता ६.६० कोटी रुपयांना विकल्या होत्या, ज्या त्यांनी २०१७ मध्येच खरेदी केल्या होत्या. याशिवाय, त्यांनी एप्रिल २०२५ मध्ये लोअर परळ येथील आपले कार्यालय ८ कोटी रुपयांना विकले होते.


अक्षय कुमारचे आगामी चित्रपट


चित्रपटांच्या आघाडीवर अक्षय कुमार लवकरच 'भूत बंगला' या सिनेमात वामिका गब्बी आणि परेश रावल यांच्यासोबत दिसणार आहेत. तसेच, प्रेक्षकांना सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत 'हेरा फेरी ३' मध्येही त्यांना पाहता येणार आहे. 'वेलकम टू द जंगल' हा मल्टीस्टारर चित्रपट, ज्यात १५ हून अधिक कलाकार आहेत, तो देखील त्याच्या आगामी प्रकल्पांमध्ये समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, अक्षय कुमारचे चाहते 'जॉली एलएलबी ३' आणि 'हैवान' या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा

Shahid Kapoorला हा नाश्ता इतका आवडतो की सातही दिवस तो खाऊ शकतो, मीरा राजपूतने केला खुलासा

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दोघेही त्यांच्या फिटनेसबद्दल आणि डाएटबद्दल खूप