शहरात डेंग्यू रुग्ण संख्येत तिपटीने वाढ

नाशिक रोडला सर्वाधिक २३ रुग्णांची नोंद


नाशिक : शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ चिंतेचा विषय बनला आहे. जूनमध्ये २५ वर असलेली डेंग्यू रुग्णसंख्या जुलैत तिपटीने वाढली आहे. जुलैच्या गेल्या २८ दिवसांत तब्बल ७५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामध्ये नाशिकरोडमध्ये सर्वाधिक २३, तर त्या खालोखाल सातपूरमधील १४ रुग्णांचा समावेश आहे.
पावसाळा सुरू होताच शहरात डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढला आहे. मे महिन्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्याही वाढत आहे. जानेवारीत ३७ डेंग्यू रुग्ण आढळले होते. फेब्रुवारीत ३२, मार्च : २१, एप्रिल : १५, मे महिन्यात १७, तर जून महिन्यात २५ रुग्ण आढळले होते. जुलैच्या गेल्या २८ दिवसांतच डेंग्यू रुग्णसंख्येत तिपटीने वाढ झाली आहे.

जुलै महिन्यात डेंग्यूचे ७५ रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिकरोड विभागातील सर्वाधिक २३ रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यूच्या अळ्या तपासण्यासाठी सहा विभागांत मोहीम हाती घेण्यात आली असून, दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोशिरे यांनी दिली. नाशिक शहरात मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्यामुळे जूनमध्ये डेंग्यूचे पुनरागमन झाले.

डेंग्यू आजाराच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या एडीस इजिप्ती या प्रजातीच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते. पावसामुळे घर परिसरातील नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये पाणी साचते. या स्वच्छ पाण्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरात संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. तसेच मोकळे भूखंड, उद्याने, मैदाने या ठिकाणी गवत वाढून डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यातच हवामान बदल झाल्यामुळे डासांना पोषक वातावरण निर्माण झाले. पंचवटी, जेल रोड, म्हाडा कॉलनी या परिसरात उघड्या सार्वजनिक शौचालयांमुळे डासांचा उद्रेक वाढला आहे.

विभागनिहाय डेंग्यू रुग्णसंख्या अशी...



  • नाशिकरोड : २३

  • सिडको : १२

  • पंचवटी : ७

  • नाशिक पूर्व : ११

  • सातपूर : १४

  • नाशिक पश्चिम : ८

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे