‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना अडचणीत

प्रा. नंदकुमार काकिर्डे


आज जगभरातील लाखो कर्मचारी काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य व लवचिकता यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ही स्वप्नवत संकल्पना राबवत आहे. प्रत्यक्षात खूप थोडे कर्मचारी त्याचा खराखुरा आनंद घेत असल्याचे आढळते. समाजातील सांस्कृतिक आशा-अपेक्षा, व्यवस्थापनाचा मुलतः असलेला विरोध किंवा त्याबाबतची साशंकता, त्यातील अदृश्य खर्चाची दाट गुंतागुंत यामुळे ‘वर्क फॉर्म होम’ बाबतच्या अपेक्षा व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात खूप अंतर आहे. त्यामुळेच ‘वर्क फ्रॉम होम’ एक दुधारी शस्त्राचे फायदे-तोटे स्पष्ट झाले असून ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीतील गुंतागुंत वाढल्याचे दिसते. भारतासह चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि अन्य काही देशांमध्ये अजूनही प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन जागेवर काम करणे म्हणजे कंपनीशी निष्ठा, शिस्त आणि गांभीर्य मानले जाते. या अहवालात अमेरिका किंवा कॅनडा, इंग्लंड या देशांमध्ये जे सर्वेक्षण करण्यात आले. तेथील कामगारांना आठवड्यामध्ये किमान १.६० दिवस तर आशिया खंडात १.१ दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ करावेसे वाटते. २१ व्या शतकातील कामगारांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर ‘वर्क फ्रॉम होम’ आधुनिक कामाचे वैशिष्ट्य मानावे लागेल.


कोरोना महामारीच्या आधीपासूनच १९७०च्या दशकात काही देशांमध्ये या संकल्पनेचा प्रारंभ झाल्याचे दिसते. जगातल्या सर्वोत्कृष्ट ‘फॉर्च्यून ५००’ कंपन्या आहेत, त्यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ आणि कंपनीत जाऊन काम करण्याच्या संकरित वेळापत्रकाला म्हणजे हायब्रिड पद्धतीला जास्त प्राधान्य देत आहेत. आठवड्यातील तीन दिवस ऑफिसमध्ये जाऊन काम करावे, तर दोन दिवस घरून काम करावे असे त्यांना वाटते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पाहणीनुसार १२ टक्के कर्मचारी, अधिकारी वर्गाला कंपनीत जाऊन काम करण्याची जबरदस्त इच्छा आहे.या पाहणीत कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे फायदे तोटे विचारण्यात आले. कोरोना महामारी अत्युच्च पातळीवर असल्यापासून गेल्या तीन-चार वर्षात स्थिर होत असलेली कामाची ‘हायब्रीड’ पद्धत कर्मचाऱ्यांना फायदेशीर झाल्याचे आढळले. ‘वर्क फ्रॉम होम’ शब्द जगभरात ‘रिमोट वर्क’ म्हणून ओळखला जातो. ‘रिमोट वर्क’साठी आघाडीवर युरोपातील देश असून त्यात एस्टोनिया, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, नेदरलँड्स, अमेरिका, न्युझीलँड, आयर्लंड, बेल्जियम व कॅनडा यांचा समावेश आहे. या देशात डिजिटल पायाभूत सुविधा व्यापक प्रमाणात, चांगल्या दर्जाच्या आहे. मात्र जागतिक पातळीवर यावर वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट वर्क यातील गुंतागुंत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपल्याकडे अजूनही प्रत्यक्ष कामावर हजर असण्याची ‘संस्कृती’ हट्टीपणाने टिकून आहे. कर्मचाऱ्यांचे आकुंचित होत असलेले राहणीमान, घरामध्ये ‘कामासाठी’ ठरवण्यात येणाऱ्या जागेची कमतरता आणि अविश्वासार्ह इंटरनेट सेवा-सुविधा यामुळे शहरातील कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धती जास्तीतजास्त अव्यवहार्य किंवा अप्रिय होत असल्याचे या पाहणीत आढळले. कोणत्याही भौगोलिक परिस्थितीपेक्षा या पद्धतीवर मोठे सावट आढळले आहे ते लिंग भेदाचे. आजही अनेक देशांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना वर्क फ्रॉम होम सुविधा जास्त आवडणारी असून पुरुष वर्गाला मात्र त्याची ‘अडचण’ जाणवत असल्याचे किंवा वाढत असल्याचे दिसते.


घरकाम करणाऱ्या महिलांना आठवड्यातून जवळजवळ तीन दिवस तर मुलंबाळे नसलेल्या महिलांना दोन ते अडीच दिवस वर्क फ्रॉम होम करावेसे वाटते. मात्र कुटुंब वत्सल पुरुषांना घरून काम करण्यामध्ये फारशी आवड नसल्याचे आढळले आहे. यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगभरातील बहुतेक सर्व कुटुंबातील महिलेला कोणताही मोबदला न मिळता करावे लागणारे घरकाम हा कळीचा मुद्दा आहे. बहुतांश महिलांना घरकामाच्या जोडीलाच नोकरीच्या कामाची साथ मिळाली तर ती निश्चित हवी असते. मात्र नोकरी व घरकाम या दोन्ही पूर्ण वेळच्या भूमिका पार पाडणे ही महिलांसाठी तारेवरची कसरत ठरते असेही आढळले आहे. नोकरी करणाऱ्या पुरुषांची मानसिकता अद्यापही घरकाम करणाऱ्या महिलेला मदत करण्याची किंवा सहकार्य करण्याची नाही हे या पाहणीमध्ये जास्त स्पष्ट झाले आहे. पुरुषांचा विचार करायचा झाला, तर त्यांना स्वतःचे आरोग्य किंवा छंद जोपासता येतात. ऑफिसच्या वातावरणापासून त्यांना सुटका हवी असते. त्यांची कार्यक्षमता वाढते असे निरीक्षण आहे. काही कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ जास्त पसंतीचे, आवडीचे आहे. तरीही गेल्या एक दोन वर्षांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’चे सरासरी प्रमाण कमी झालेले आहे.


अनेक व्यवस्थापनांना ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना फारशी प्रिय नाही. त्यांना त्याबाबत अस्वस्थता आहे. कारण कोणत्याही कंपनीमध्ये एकत्रित काम केल्यामुळे निर्माण होणारी संघ भावना या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कमी होताना दिसते. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांवर देखरेख करणे किंवा कर्मचाऱ्यांमध्ये नावीन्यता निर्माण होण्याचा अभाव दिसायला लागलेला आहे. अनेक उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या घरी कामाची हत्यारे किंवा अन्य सुविधा देणे शक्य नसते. त्यामुळे कार्यालयात जाऊन प्रत्यक काम करण्यासारखी शक्तिशाली पद्धती नाही असे व्यवस्थापनांचे आग्रही प्रतिपादन आढळते. ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधेमध्ये कर्मचाऱ्यांचे आजारपण हा गंभीर विषय आहे. गेल्या काही वर्षात या कर्मचाऱ्यांना शारीरिक आजार, दृष्टीदोष किंवा सांधेदुखी याच्या जोडीलाच मानसिक आजारपण वाढत्या प्रमाणावर येत असल्याचे पाहणीत आढळले आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची घरे अधिक सुरक्षित व कार्यक्षमता वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक केली पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याची मानसिक व शारीरिक आरोग्यस्थिती उत्तम राहील याची दक्षता घेतली पाहिजे. गेल्या काही वर्षात मानसिक ताणामुळे आयुष्य संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यांची आत्महत्यांची संख्या चिंताजनकरीत्या वाढलेली दिसते. त्यामुळेच कर्मचाऱ्यांचे स्वातंत्र्य त्यांच्यावरील नियंत्रण, त्यांच्यावरील विश्वास, त्यांची स्वायत्तता, त्यातून निर्माण झालेल्या एकाकीपणाच्या समस्या यात प्रतिबिंबित झाल्याचे दिसते. त्यावर गांभीर्याने मार्ग काढण्याची गरज आहे.

Comments
Add Comment

खरेदीयात्रा रंगणार, समुद्री शक्ती वाढणार

महेश देशपांडे सरत्या आठवड्यातील प्रमुख आर्थिक बातम्यांमध्ये अंदाजात्मक माहिती अधिक पुढे येताना दिसते. या

२०३० पर्यंत पुनर्विकास प्रकल्प बदलणार मुंबईचे स्कायलाईन

उपनगरीय कॉरिडॉर ठरणार मुंबईच्या पुनर्विकास कहाणीचे प्रमुख केंद्र  मुंबईचा गृहनिर्माण बाजार मोठ्या बदलाच्या

Ask Private Limited व Hurun India अहवालातून गेमिंग कंपन्या बाहेर तर Zerodha नंबर १

मोहित सोमण: एएसके प्रायव्हेट लिमिटेड (Ask Private Limited) व हुरून इंडिया (Hurun India Limited) ने आपला पाचवा Ask Private Wealth Hurun India Unicorn and Future Unicorn 2025 अहवाल

आतापर्यंत ६ कोटी लोकांनी ITR भरला आयकर विभाग म्हणाले, 'आतापर्यंत.....

प्रतिनिधी:कर निर्धारण वर्ष (Income Tax Assesment Year) २०२५-२६ साठी आतापर्यंत सहा कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे (ITR Filings) दाखल

Explainer- ITR भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस ! 'या' १५ चुका टाळल्यास तुमचा आयटीआर चुकणारच नाही

आयटीआर (Income Tax Returns) भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे एकप्रकारे करदात्यांना धाकधूक असते. त्यावेळी

आरबीआयकडून फोन पे ला २१ लाखांचा दंड

प्रतिनिधी:आरबीआयने (Reserve Bank of India) फोन पे या आघाडीच्या फिनटेक कंपनीला २१ लाखांचा दंड ठोठावला आहे. शुक्रवारी याबद्दल