अहिल्यानगर : शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली. सोमवारी सकाळी राहत्या घरी छताला गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. शेटेंच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
नितीन शेटे हे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपासून देवस्थानच्या प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या आरोपांचा आणि आत्महत्येचा संबंध आहे का ? याचाही पोलीस तपास सुरू आहे.